अखेर महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला..
वणी:- विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना(उबाठा) पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. परिणामी विदर्भातील काही जागांवर एकमत न झाल्याने उमेदवारी जाहीर करण्यात उशीरच झाला. अखेर विदर्भाच्या जागेवरील तिढा सुटला अन वणी विधानसभा महाविकास आघाडीची उमेदवारी शिवसेना(उबाठा) पक्षाला गेल्याचे शिवसेने कडून जाहीर करण्यात आले आहे.Finally,-he-became-the-candidate-of-Mahavikas-Aghadi.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी कडून काँग्रेस,शिवसेना(उबाठा) पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी वणी विधानसभेची उमेदवारी आपल्याला कशी मिळेल, यासाठी पक्षश्रेष्ठी कडे जोरदार मोर्चेबांधणी केली होती. यात काँग्रेस कडून माजी आमदार वामनराव कासावार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे, पणन चे संचालक संजय खाडे आदींनी वरिष्ठांकडे उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. तर शिवसेना(उबाठा) पक्षाकडून माजी आमदार विश्वास नांदेकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, संजय निखाडे यांनी सुद्धा उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. यातच महाविकास आघाडीचा विदर्भातील जागेवरून तिढा निर्माण झाला होता. यासंबंधीची मंगळवारी दुपारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यात वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना(उबाठा) पक्षाचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यातील शिवसेना(उबाठा) पक्षाने ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद अद्याप झाली नसल्याचे समजते.
वणीत होणार दमदार लढत!
वणी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना महायुतीने उमेदवारी जाहीर केली आहे. सलग दोनदा या मतदारसंघात भाजपाने प्रतिनिधित्व केले आहे. तर त्यांच्या तुल्यबळात महाविकास आघाडीने संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने वणी विधानसभेत दमदार लढत होण्याची शक्यता आहे.