वडिलांच्या निधनानंतर आवारी कुटुंबीयांचा आगळावेगळा उपक्रम.
वणी:-(रवी ढुमणे)
यवतमाळ जिल्हा, मारेगाव तालुक्यातील खैरगाव (बुट्टी) येथील स्व. भोजाजी आवारी यांचे १९ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यानंतर कुटूंबियांनी २९ सप्टेंबर ला खैरगाव येथे गंगापूजनाचे निमित्ताने एक आगळावेगळा उपक्रम राबवित समाजाला एक वेगळाच संदेश दिला आहे.After the death of the father, the next activity of the Awari family.
मारेगाव तालुक्यातील खैरगाव(बुट्टी) येथील भोजाजी मारोतराव आवारी हे १९ सप्टेंबर रोजी स्वर्गवासी झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आवारी कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या देहाची राख इतर कुठेही विसर्जित न करता. त्यांच्या मालकीच्या शेतात नेऊन शेतीच्या मातीत मिसळून घेतली. व ज्या ठिकाणी त्यांच्या देहाची राख पुरविण्यात आली होती. त्या जागी आंब्याची रोपटे लावून समाजाला एक नवा संदेश दिला आहे. इतकेच नव्हे तर २९ सप्टेंबर रोजी त्यांच्या खैरगाव येथील घरी गंगापूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आवारी कुटूंबातील श्रीमती लिलाबाई भोजाजी आवारी,गुलाब भोजाजी आवारी, नथ्थू भोजाजी आवारी, उमेश भोजाजी आवारी व संपूर्ण आवारी कुटुंबीयांनी २९ सप्टेंबर ला पहाटे सव्वा पाच वाजता पासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सामुदायिक ध्यान व मार्गदर्शन, परिसर स्वच्छता,घटस्थापना व फोटो पूजन,ग्रामगीता वाचन,भजन, कीर्तन आणि विशेष म्हणजे कीर्तनकार आशिष माणुसमाने महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम, श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम, प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन, त्यानंतर सामूहिक भोजन व सामुदायिक प्रार्थना घेऊन एक समाजाला नवीन दिशा देणारा कार्यक्रम स्व.भोजाजी आवारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केला आहे. अशा या आगळ्यावेगळ्या गंगापूजनाच्या कार्यक्रमाची परिसरात चांगलीच चर्चा होत असून कौतुकही केले जात आहे.