पायल च्या आत्महत्या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल.
वणी:- तालुक्यातील परसोडा येथील २० वर्षीय प्रेमविवाह झालेल्या सात महिन्याची गर्भवती असलेल्या पायल ने ३० सप्टेंबर ला सकाळी ११ वाजताचे सुमारास ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मृतक पायल च्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध मुकुटंबन पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. Case registered against four persons in Payal's suicide case.
वणी तालुक्यातील नवरगाव येथील पायल चा प्रेमविवाह परसोडा येथील गौरव उरकुडे सोबत झाला होता. अगदी काहीच महिने संसार नीट होता. अचानक दाम्पत्यात काही अडचण आली की काय?असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र यात सात महिन्याची गर्भवती असलेल्या पायल ला सासरी मानसिक छळ,शारीरिक छळ व घर बांधकाम करण्यासाठी एक लाख रुपये माहेरून घेऊन ये असा तगादा सासरच्या लोकांनी लावला होता. अशी तक्रार मृतक पायल ची आई सविता हिने मुकुटंबन पोलिसांत देत सासरच्या मंडळींनी संगनमत करून तिच्या चारित्र्यावर संशय धरून माहेरून घर बांधकाम करण्यासाठी एक लाख रुपये आणले नाही तर, दुसरे लग्न करेल अशी धमकी सुद्धा गौरव ने देत मृतक पायल ला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा उल्लेख तक्रारीतून करण्यात आला आहे. मृतक पायल ची आई सविता हिने दिलेल्या तक्रारीवरून गौरव च्या कुटुंबातील चार जणांविरुद्ध कलम, १०८, ८५, ३५२, ३५१' (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.