भाजप कार्यकर्त्यांच्या वक्तव्याने सकल कुणबी समाजात असंतोष?

0

 भाजप कार्यकर्त्यांच्या वक्तव्याने सकल कुणबी समाजात असंतोष?

वणी :- (यवतमाळ)

वणी विधानसभा  ७६ च्या निवडणूक दरम्यान एका भाजप कार्यकर्त्याने कुणबी सकल समाजाला एका प्राण्याची उपमा देत अवाजवी वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद संपूर्ण विधानसभा क्षेत्रात उमटले. यावर भाजपचे विद्यमान आमदार यांनी या वक्तव्याचे खंडन केले  मात्र भाजपात जिल्हाध्यक्षपदी असलेल्या  नेत्यांनी तडजोड केली असल्याची माहिती आहे.  सदर प्रकरण त्यांनीच हाताळले खरे, पण इतर कुणबी नेत्यांनी मौन बाळगले असल्याचे स्पस्ट दिसून आले.  सदर वाद उफाळला असतांना विद्यमान आमदारांनी त्यावर पांघरून घातले. आता त्या भाजप कार्यकर्त्यांच्या, त्या वक्तव्यावर सकल कुणबी समाजात असंतोष पसरल्याचे चित्र बघायला मिळाले. Dissatisfaction-in-the-entire-Kunbi-community-with-the-statement-of-BJP-workers?

भाजप कार्यकर्त्यांच्या वक्तव्याने सकल कुणबी समाजात असंतोष?

     यवतमाळ जिह्यातील वणी विधानसभा क्षेत्रातील भाजपचे विद्यमान आमदार यांनी  ५ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली, यातच त्यांचे जिवलग असलेल्या,शेवाळकर डेव्हलपर्स परिसरातील कास्तकारांच्या एका हॉल मध्ये  आयोजित कार्यक्रमात सुधीर नावाच्या एका तरुणाने(खास लोकप्रतिनिधी) यांचा हस्तक? यानेच....सकल कुणबी समाजावर अवाजवी भाष्य केले. यावरच! सकल कुणबी समाजात भाजपा विरुद्ध असंतोष पसरला. मात्र कुणबी नेते पोलीस ठाण्यात आले नव्हते?आले होते ते फक्त ! समाजबांधव..  आणि जर जगाचा पोशिंदा म्हणवून घेणाऱ्यांना, ही तर चपराक तर नव्हे ना? असे असल्याचे दिसून आले.  आणि हे केवळ हस्तकच आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झाला. कितीही खंडन केले तरी कुणब्याना एका पाचशे रुपयांची लायकी असे उद्गार काढणाऱ्यांना कुणबी माफ करणार नाही. अन,लढा शेवटपर्यंत लढू अशी भूमिका सकल कुणबी समाज घेणार असल्याचे दिसून आले.

सदर हस्तकावर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असल्याची माहिती आहे.

आता कुणबी समाज कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

सकल कुणबी बांधवांनी केला निषेध!

मातीत बी रुजवणारा शेतकरी म्हणजेच कुणबी! त्यावर भाजपच्या व विद्यमान आमदार यांचा खास मर्जीतील कार्यकर्ता याने ५ नोव्हेंबर ला कुणबी म्हणजे फक्त पाचशे रुपये घेऊन विकणारा असा काहीसा उल्लेख केला होता. त्यावर सकल कुणबी बांधवांनी  यावर आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दिली होती.त्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहे. आता विद्यमान महोदय त्या उद्गाराचे खंडन करत असल्याचे एक वर्तमान पत्रात वाचण्यात आले आहे. म्हणजेच???

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top