गेल्या दहा वर्षात मोडले शेतकरी,सामान्य जनतेचे कंबरडे..
वणी:- यवतमाळ जिल्हा आत्महत्या शेतकरी जिल्हा म्हणून प्रचलित आहे. मात्र गेल्या दहा वर्षात महायुती सरकारने शेतकरी,सामान्य जनतेचे जणू कंबरडे मोडले आहे. परिणामी जनतेने गेल्या दहा वर्षात भोगले ते यापुढे होणार नाही असे उद्गार अपक्ष उमेदवार संजय खाडे यांनी काढले आहे. In-the-last-ten-years,-the-backs-of-farmers-and-common-people-have-been-broken.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआ,महायुती, आणि अपक्ष सोबतच मनसे आपापली ताकद दाखवीत विविध मुद्दे घेऊन प्रचारात उतरली आहे. मविआ, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, वृद्ध सोबतच जातनिहाय जनगणना,वीज ३०० युनिट माफ,महात्मा फुले,शाहीर अण्णाभाऊ साठे, आदी थोर महापुरुषांना भारतरत्न देणार, महिलांना तीन हजार देणार असे अनेक मुद्दे घेऊन प्रचारात उतरली आहे.
तर महायुती विकासाचे मुद्दे घेऊन मैदानात उतरली असताना मनसे व अपक्ष उमेदवार संजय खाडे यांनी गेल्या दहा वर्षात शेतकरी, सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या महायुती सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी आपण उमेदवारी दाखल करून मैदानात उतरल्याचे स्पष्ट केले आहे.
कुणबी मुद्दा गाजनार?
सकल कुणबी समाजाला भाजप कार्यकर्त्याने एका प्राण्याची उपणा देत "पाचशे रुपयांत विकणारे हे , असे वक्तव्य करून सकल कुणबी समाजाला खालची भाषा बोलणाऱ्यांना व तेढ निर्माण करणाऱ्याला जनता धडा शिकवेल असे मत संजय खाडे यांनी व्यक्त केले आहे. सोबतच संजय खाडे यांचा झंझावात सुरू आहे. आता सुज्ञ वणी विधानसभेतील जनता कोणाला गुलाल लावणार हे २० नोव्हेंबर ला दिसणार आहे. सध्यातरी शेतकरी,शेतमजूर, व्यापारी, आणि सामान्य जनता महायुती सरकार ला कंटाळली असल्याने तेच योग्य निर्णय घेतील असे मत संजय खाडे यांनी व्यक्त केले आहे.