कापूस चोरीचा गुन्हा अवघ्या २४ तासात उघड.
शिरपूर पोलिसांची कारवाई.
वणी:- शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुरई येथील शेतकऱ्याच्या शेतात वेचणी करून ठेवलेले दोन क्विंटल कापसाचे गाठोडे चोरून नेल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्याने शिरपूर पोलिसांत २८ डिसेंबर ला दिली होती. संबंधीत चोरीचा छडा लावत अवघ्या २४ तासात शिरपूर पोलिसांनी तिघांना जेरबंद केले. Cotton-theft-case-solved-in-just-24-hours.-Action-taken-by-Shirpur-police.
तालुक्यातील कुरई येथील गिरीधर सिताराम मोहीतकार या शेतकऱ्याने शेतात २६/१२/२०२४ रोजी कापुस वेचणी करून कापुस आणण्यासाठी बैलगाडी न मिळाल्याने कापसाचे गाठोडे वजन अंदाजे ०२ क्विंटल सायंकाळी सहा वाजता शेतात ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता शेतात जावुन पाहीले असता शेताव ठेवलेले तीन कापसाचे गाठोडे वजन अंदाजे दोन क्विंटल किंमत अंदाजे १५ हजार आठशे रुपये किमतीचे दिसुन आले नाही. त्यानंतर आजुबाजुला शोध घेतला असता मिळुन आले नाही. कोणीतरी अज्ञात ईसमाने कापसाचे तीन गाठोडे वजन अंदाजे दोन क्विंटल किंमत अंदाजे १५ हजार आठशे रुपये किमतीचे चोरून नेल्याची तक्रार पोलिसांत दिल्यावरून कलम ३०३ (२) भा.न्या. संहीता प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. सदर गुन्हयाचे तपासात गोपनिय बातमीदार तसेच तांत्रीक विश्लेषण करून संशयीत ईसम नामे ०१) आसीक शेख ईब्राहीम शेख वय ३२ वर्ष ०२) वैभव मारोती मडकाम वय २४ वर्ष ०३) शिवाजी उर्फ मिथुन विठठल मरसकोल्हे वय ३२ वर्ष रा तिन्ही रा. कुरई ता. वणी जि. यवतमाळ यांना ताब्यात घेवुन गुन्हयाचे बाबत विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर आरोपीं कडुन गुन्हयात चोरी केलेला तीन गाठोडे कापुस वजन अंदाजे दोन क्विंटल किंमत १५८००/रू व कापुस वाहतुक करणे करीता वापरलेली मोटार सायकल क्रमांक एम.एच.३३ जे ११३५ हिरो होंडा स्पेंन्डर प्लस किंमत ६०,०००/रू असा एकुण ७५,८००/रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील सविस्तर तपास सुरू आहे.
सदरची कारवाई कुमार चिंता पोलिस अधिक्षक सो. यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलिस अधिक्षक सो. यवतमाळ, गणेश किंद्रे सो. उपविभागीय पोलिस अधिकारी वणी, ज्ञानोबा देवकते पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे शिरपुर येथील सपोनि माधव शिंदे ठाणेदार पो.स्टे. शिरपुर, पोउपनि रावसाहेब बुधवंत, गंगाधर घोडाम, विनोद काकडे यांनी पार पाडली आहे.