अट्टल दुचाकी चोरटा १९ दुचाकीसह गजाआड.

0

 


अट्टल दुचाकी चोरटा १९ दुचाकीसह गजाआड.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

वणी:- यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपळखुटी परिसरात गस्तावर असतांना संशयास्पद स्थितीत दुचाकी घेऊन जाणाऱ्या तरुणाची चौकशी केली असता त्याने विवीध भागातील १९ दुचाकी चोरी केल्याचे दिसून आल्याने दुचाकी चोरट्यास आठ लाख ४० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह गजाआड केल्याची घटना रविवारी २९ डिसेंबर ला उघडकीस आली आहे. A-stubborn-two-wheeler-thief-with-19-two-wheelers.

अट्टल दुचाकी चोरटा १९ दुचाकीसह गजाआड.

     जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ यांनी मालमत्ते विरूध्द गुन्हे करणाऱ्या आरोपी विरूध्द कडक कार्यवाही करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिले होते.  त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थागुशा यवतमाळ यांनी त्यांचे अधिपत्याखालील सर्व अधिकारी व अंमलदार यांना मालमत्तेच्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे निर्देशित केले होते.

     त्या निर्देशाचे पालन करीत   २९डिसेंबर रोजी सपोनिरी अजयकुमार वाढवे स्थागुशा यवतमाळ हे त्यांचे पथकासह पिंपळखुटी परीसरात पेट्रोलींग करीत असतांना एक इसम त्याचे ताब्यातील दुचाकी क्रमांक टि.एस. १८ ई १८२४ क्रमांकाची मोटार सायकल घेवुन जातांना आढळुन आला. त्याला त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्यांने त्याचे नाव रेहमतुल्ला मुजिब चाऊस रा. आदिलाबाद राज्य तेलंगणाा असे सांगीतले. परंतु त्याचे ताब्यातील मोटार सायकलचा क्रमांक हा निर्मल जिल्हयातील असल्याने व सदर इसमाने त्याचा पत्ता आदिलाबाद येथील सांगीतल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्याला अधिक विचारपुस केली असता त्याने सदरची मोटार सायकल मुकुटबन परिसरातुन चोरी केल्याचे सांगीतले.

शेवटी कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता त्यांने सदर परिसरातुन १९ मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केले.  चोरी निष्पण होताच. स्थागुशा पथकाने आठ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या एकुण १९ मोटार सायकल जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकल  यवतमाळ, चंद्रपुर, अदिलाबाद व निर्मल जिल्हयातील असल्याचे निर्दशनास आले असुन बाकी मोटार सायकलचा शोध घेणे पोलिसांनी सुरू केले आहे.

     सदरची कारवाई  कुमार चिंता पोलीस अधिक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांचे नेतृत्वात स्थागुशा यवतमाळ येथील सपोनि अजयकुमार वाढवे, पोहवा उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, पोना सुधिर पिदुरकर, पोशि रजनिकांत मडावी व चालक पोहवा नरेश राऊत यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top