पाण्याच्या टॉकीवर महिलेच्या शोले आंदोलनाची आ. संजय देरकरांनी घेतली दखल.
वणी :- विधानसभा क्षेत्रातील झरीजामनी तालुक्यातील रायपूर या छोट्याश्या गावातील एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेने तारीख १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पासून गावाच्या विकासासाठी चक्क पाण्याच्या टॉकीवर चढून आमरण उपोषण सुरू केले असता या आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. या आंदोलनाची माहिती आमदार संजय देरकर यांना मिळताच त्यांनी दोन तासात सर्व अधिकाऱ्यांना आंदोलन स्थळी उपस्थित राहण्याच्या सूचना केल्यात. आणि प्रशासन आंदोलन स्थळी दाखल झाले व आंदोलकांच्या मागण्या मान्य करीत आमदार संजय देरकर यांनी पुढाकार घेतल्याने प्रशासनाने मागण्या मान्य करीत आंदोलनाची सांगता झाली. M.L.A.-Sanjay-Derkar-took-note-of-the-woman's-"Sholay"-protest-on-the-water-talkie.
झरीजामनी हा आदिवासी बहुल तालुका आहे. या तालुक्याचा पाहिजे त्या प्रमाणात विकास कुठेच दिसून येत नाही. अनेक आदिवासी गावांमध्ये जाण्यासाठी सुरळीत रस्ते नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, स्मशानभूमी नाही, त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ते नाही, अंगणवाड्यांचे प्रश्न आहे. गावच्या मूलभूत गरजेच्या अनेक समस्या आहे.
अश्यातच रायपूर हे एक आदिवासी समाजाचं पोड आहे. या ठिकाणी केवळ ४० घरे असून १७० लोकसंख्या आहे. विशेष म्हणजे! सदर गाव भाजपचे माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या लिंगटी या गावाला लागून आहे. मागील दहावर्ष सत्तेतील आमदारकी भोगून देखील या गावाच्या मूलभूत गरजा त्यांना पूर्ण करता आल्या नाही. हेच दुर्दैव आहे. परिणामी स्वताला विकास पुरुष संबोधून विकास होत नाही तर गावाची परिस्थिती सर्वकाही बोलून जात आहे.
रायपूर या गावातील सामाजिक कार्यकर्त्या क्रांतीवीर शामादादा कोलाम महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा इंदिरा बोंद्रे यांनी गावात जाण्याचा रस्ता तत्काळ करून मिळावा, स्मशानभूमीच्या प्रश्न निपटारी लावून त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता तयार करून मिळावा, गावातील चावडी जवळील सभागृहाचे काम चालू करावे, आणि आदी समस्या घेवून शासनाच्या दरबारी चकरा मारून थकल्या नंतर सरळ पाण्याच्या टाकीवर चढून "शोले"स्टाईल आमरण उपोषणाचे शस्त्र उगारले अन, प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडवून दिली.
या आंदोलनाची माहिती वणीचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांना मिळताच त्यांनी सर्व संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांना आंदोलन स्थळी उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या असता सर्व विविध कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी आदी आंदोलनस्थळी उपस्थित झाले. आ. संजय दरेकर यांनी काल तारीख १३ डिसेंबर रोजी रायपूर गाठून अधिकारी व कर्मचारी व आंदोलक यांचेशी यशस्वीरित्या चर्चा करून पुढील दोन महिन्यात आंदोलनाच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देवून संबंधितांना त्या पद्धतीने कार्य करण्याचे सुचवून आंदोलनाची सांगता केली. आ. संजय देरकर यांच्या धडाडीच्या निर्णयाने गावकऱ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, जिल्हा बँकेचे विभागीय अध्यक्ष तथा काँग्रेस नेते राजू येल्टीवार, श्री गुरूदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर, युवक कांग्रेसचे वणी विधानसभा अध्यक्ष राहूल धांडेकर, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष निलेश येल्टीवार, माजी सभापती संदीप बर्रेवार, सरपंच गीता पुसाम, युवा सेनेचे समीर लेनगुरे, सेनेचे संदीप विंचू, झरीचे तहसिलदार रासने सा. बां. विभागाचे मून ,पं.स.विस्तार अधिकारी कैलास जाधव , तलाठी मोरे , भूमिअभिलेख विभागाचे विलास मुत्यलवार, आदिवासी प्रकल्प विभागाचे सोनटक्के ग्रामसेवक प्रकाश बळीत, हरिदास गुर्जलवार, दिवाकर पुसाम, नागोराव उरवते, अरविंद भेडोडकर,
उपसरपंच सतीश टेकाम, सदस्य अमोल तेलंग,, लक्ष्मीबाई मंडपाचे, गीताताई नैताम, सुवर्णा पदकांतीवर, गंगाधर अत्राम, शंकर अकुलवार, विनोद उप्परवार, सतीश अदेवार, दयाकर गेडाम, अनिल डेगरवार आदी मान्यवर उपस्थित होते.


%20(1).jpg)