पळसाच्या झाडाला गळफास लावून इसमाची आत्महत्या..
वणी:- पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पळसोनी येथील ५० वर्षीय इसमाने गावालगत असलेल्या शेतातील पळसाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १२ डिसेंबर गुरुवारला उघडकीस आली आहे. Man-committed-suicide-by-hanging-himself-from-a-palm-tree..
तालुक्यातील पळसोनी येथील संतोष मडावी हा लालपुलिया परिसरातील एका बिअर बार मध्ये कामाला होता. मात्र आज गुरुवारी तो कामाला गेला नसल्याचे समजते. दुपारी चार वाजताचे सुमारास शेतमालक राजेंद्र घोगले हे शेतात गेले असता संतोष पळसाच्या झाडाला गळफास लावून दिसला. शेतमालकाने तात्काळ पोलीस पाटील श्रीकृष्ण धोटे यांना घटनेची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविला. संतोषच्या आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.