ॲग्रीस्टॅक प्रकल्पाचे कामे करण्यास ग्रामसेवक संघटनेकडून बहिष्कार

0

 ॲग्रीस्टॅक प्रकल्पाचे कामे करण्यास ग्रामसेवक संघटनेकडून बहिष्कार


झरी जामणी : राज्य सरकारने ॲग्रीस्टॅक प्रकल्प अंमलबजावणी करण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु सदर कामात झरी जामणी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने नकार दिला आहे. दिवसेंदिवस ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे कामाचा वाढता व्याप बघता, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कामाचा बोजा वाढत आहे. ग्रामपंचायतचे दैनंदिन कामकाज करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना यांनी राज्यस्तरावरून हे काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे झरी जामणी येथील ग्रामपंचायत अधिकारी संघटना यांनी तहसीलदार अक्षय रासने व गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार सांगळे यांना निवेदन देऊन कामकाज करण्यास नकार दिला आहे. Village-Servants'-Association-boycotts-work-on-Agristack-project 

ॲग्रीस्टॅक प्रकल्पाचे कामे करण्यास ग्रामसेवक संघटनेकडून बहिष्कार


ग्रामपंचायत स्तरावरील वैयक्तिक लाभाच्या योजनांची अंमलबाजवणी व ग्रामपंचायतीचे इतर कामे मार्च २०२५ अखेर पूर्ण करवायची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाची असल्याने संदर्भिय शासन निर्णयानुसार अग्रीस्टॉक प्रकल्प अंमलबाजावणीस वेळ देता येणार नाही, असे राज्य आणि जिल्हा संघटनेचे ठाम मत आहे. त्यामुळे संघटनेने घेतलेल्या निर्णयाला महाराष्ट्र राज्यं ग्रामसेवक संघटना तालुका शाखा झरी जामणी बांधील असून आम्ही सुद्धा राज्य आणि जिल्हा संघटनेच्या पुढील सुचना येईपर्यंत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डी. एन. ई. १३६ तालुका शाखा झरी जामणी शाखेकडून कामे करण्यास सध्या स्थितीत बहिष्कार केलेला आहे. निवेदन देताना ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी गणेश मुके, रवींद्र पाटील, संदीप झोडे, विनोद गिज्जेवार, प्रतीक कापसे, निखिल राऊत, गौरव आईटवार, पोतरेड्डी बद्दमवार, कुडमेथे मॅडम, एन के कोरडे व ग्रामसेवक संघटनेचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top