आरसीसीपीएल कंपनीची कोणतीही मुजोरी खपवून घेणार नाही.
मुकुटंबन येथील जनता दरबारात आमदार संजय देरकर
वणी(मुकुटंबन) :- झरी जामनी तालुक्यातील मुकुटंबन परिसरातील आरसीसीपीएल (RCCPL) तसेच डोलोमाईट व लाईम स्टोन कंपनी मुकुटंबन,अडेगाव, येडशी,गणेशपूर, पिंप्रड, बैलमपूर, राजूर गोटा,हिरापूर, भेंडाळा, चिलई, तेजापूर परीसरातील कंपनी संदर्भात तक्रार व अडी अडचणी सोडवण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी समस्या जाणून घेतांना आरसीसीपीएल व इतर कंपन्यांची कोणतीही मुजोरी खपवून घेणार नाही असे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी समस्याग्रस्त जनतेला सांगितले. RCCPL-will-not-tolerate-any-negligence-from-the-company.
झरी जामनी तालुक्यातील मुकुटंबन परिसरातील आरसीसीपीएल (RCCPL) तसेच डोलोमाईट व लाईम स्टोन कंपनी मुकुटंबन,अडेगाव, येडशी,गणेशपूर, पिंप्रड, बैलमपूर, राजूर गोटा,हिरापूर, भेंडाळा, चिलई, तेजापूर परीसरातील कंपनी संदर्भात तक्रार व अडी अडचणी सोडवण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यात आरसीसीपीएल कंपनी मनोपल्ली वाढली असून पिंप्रड वाडी या गावातील लोकांना संबंधित कंपनीच्या ब्लास्टिंग मुळे अनेकांचे नुकसान होत आहे. सदर गाव कंपनीने दत्तक घेतले असतांना या गावाला सीएसआर फंड नाही. धुळीच्या प्रदूषणामुळे जनावरांच्या चराईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भूजल पातळी,पिकांचे नुकसान, तुटपुंजी मदत,यावर्षी कोणालाही मदत कंपनीने दिली नाही. कंपनीतून निघणाऱ्या सांडपाण्याची कोणतीही विल्हेवाट लावली नाही. सर्व पाणी दूषित असल्याने शेतकरी व मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एका शेतकऱ्याने या सांडपाण्याच्या त्रासाला कंटाळून शेती करणे सुद्धा सोडले आहे. सदर कंपनीची मुजोरी इतकी वाढली की कोणताही शेतकरी ग्रामस्थ तक्रार घेऊन गेल्यावर त्याला धमकावत असल्याचे जनता दरबारात समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
प्रदूषणाने सर्वच त्रस्त!
प्रदूषणाने लगतच्या शेती नेस्तनाबूत झाल्या आहेत. यातील एका शेतकऱ्याची शेतजमीन २०११ मध्ये सिमेंट कंपनी ने घेतली होती. मात्र कंपनीने कोणालाही काम दिले नाही. प्रदूषणाने शेतीचे नुकसान झाले. त्याची नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतात उत्पन्न होत नाही. प्रदूषणाचा प्रश्न सर्वात गंभीर आहे. मजूर शेतात यायला तयार नाही, रस्ता जाण्यायोग्य नाही. पूल नादुरुस्त,आहे. परिणामी कंपनीने जो रस्ता तयार करून दिला त्याचा वापर शेतकऱ्यांना नाही तर कंपनीच करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी जनता दरबारात केला आहे. सोबतच बेरोजगारांना रोजगार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या शेती हस्तांतरित केल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्य बेरोजगार असल्याचे प्रश्न सुद्धा उपस्थित केले गेले. सर्वात महत्वाचा मुद्दा दिव्यांग लोकांचा होता. सोबतच अनेक समस्या मुकुटंबन येथे घेण्यात आलेल्या जनता दरबारात समस्याग्रस्त लोकांनी मांडल्या होत्या. सर्वांच्या समस्या ऐकून घेत आमदार संजय देरकर यांनी बोलतांना कंपनीचे अधिकारी व ग्रामस्थ यांची गावनिहाय बैठक घेऊन समस्या निकाली काढण्याचे जनता दरबारात सांगितले. प्रसंगी मंचावर दीपक कोकास, संतोष माहुरे, राजीव कासावार, संजय निखाडे, राजू एलटीवार, भूमारेड्डी बाजनलावार, नगराध्यक्षा सौ ज्योती बीजगूनवार, नगरसेविका सौ रजनी नैताम, सौ शीला चौधरी नगरसेवक संतोष मंचलवार,नगरसेविका सौ सुजाता अनमूलवार,सौ सीमा मंडाले, संगीता कनाके सह परिसरातील असंख्य जनता उपस्थित होती.
या जनता दरबाराचे सूत्रसंचालन नेताजी पारखी यांनी केले.
पहिल्यांदाच भरला जनता दरबार
मुकुटंबन येथील जनता दरबारात बोलतांना समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी समस्या कथन करतांना पहिल्यांदाच आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार महोदयांनी जनता दरबार भरविला आहे. त्यामुळे आम्ही आमदार साहेबांचे जाहीर आभार मानतो असे उद्गार समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी जनता दरबारात बोलतांना व्यक्त केले.
कंपन्यांची मुजोरी खपवून घेणार नाही.
मुकुटंबन परिरातील कंपन्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. यापुढे संबंधित कंपन्यांची कोणतीही मुजोरी खपवून घेणार नाही.
आमदार संजय देरकर.