ग्रामीण रुग्णालयातील त्या लिपिकाची आरोग्य उपसंचालकाने मागितली कुंडली.

0

 ग्रामीण रुग्णालयातील"त्या "लिपिकाची आरोग्य उपसंचालकाने मागितली कुंडली.

वणी:- ग्रामीण रुग्णालयातील लिपिकाने कोविड काळातऑक्सिजन चे खोटे देयके काढून अफरातफर केल्याची तक्रार गणेश मधुकर चौधरी उपशहर प्रमुख अकोला तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांनी केली होती. त्या तक्रारीवरून संबंधित लिपिकावर अफरातफर केल्यासंबंधीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणात अटक झाली की, नाही.  यासंबंधीची माहिती अकोला आरोग्य  उपसंचालकानी जिल्हा शल्य चिकित्सक, व वणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना मागितली आहे.The-Deputy-Director-of-Health-asked-for-the-horoscope-of-"that"-clerk-at-the-rural-hospital.

ग्रामीण रुग्णालयातील"त्या "लिपिकाची आरोग्य उपसंचालकाने मागितली कुंडली.

पूर्वी वणी ग्रामीण रुग्णालयात व सद्यःस्थितीत जिल्हा आस्थापनेवर कार्यरत असलेले सतिष जोगी, वरीष्ठ लिपीक यांनी ग्रामिण रुग्णालय, वणी येथे कार्यरत असतांना, सन २०२१-२२ च्या कोविड काळात अधिकारी/कर्मचारी यांच्याशी संगनमत करुन अभिलेखात दिनांक २७.०४.२०२१ पासून दररोज १६ तास ऑक्सिजन ऑरेंटर म्हणून बेकायदेशीर नोंदी घेत तसेच रक्कमा मिळाल्याच्या पावत्या लिहून घेऊन बनावट प्रमाणपत्रे तयार करून शासकीय रक्कमेचा गैरव्यवहार केला आहे. तसेच उक्त प्रकरणी यांवर पोलीस स्टेशन वणी येथे भा. दं.वि. कलम ४६५,४६६,४६८,४७१ सह कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल असल्याने त्याना पदोन्नती न देता त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करीत प्रशासकीय कारवाई करण्यासंबंधीची तक्रार गणेश मधुकर चौधरी उपशहर प्रमुख अकोला व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांनी आरोग्य उपसंचालक अकोला यांचेकडे केली होती.  तसेच न्यायालयाचे आदेशान्वये लिपिक सतीश जोगी यांच्याविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल असल्याचे रवींद्र कांबळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्या अनुषंगाने आरोग्य उपसंचालक कार्यालयाने लिपिकाला अहवाल सादर करण्याचा पत्रव्यवहार केला होता. मात्र संबंधित लिपिकाने कोणताही अहवाल सादर केला नसल्याने.  नियमान्वये कार्यवाही करण्याच्या दृष्टीने सतीश जोगी यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन वणी जि. यवतमाळ येथे कलम ४६५,४६६,४६८, ४७१ सह कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल असल्याबाबतचे संपूर्ण दस्ताऐवज आपले अभिप्रायासह तात्काळ आरोग्य उपसंचालक कार्यालयात सादर करावे, तसेच  सतिष जोगी यांना उक्त गुन्ह्यामध्ये अटक झाली होती काय? की, संबंधीतीत कर्मचारी फरार होते? याबाबतची संपूर्ण माहीती देण्यासंबंधीचे पत्र जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ, व वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वणी यांना आरोग्य उपसंचालक अकोला यांनी दिले आहे. सदर भ्रष्टाचार प्रकरणात आणखी किती मासे अडकणार? या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण? भ्रष्टाचार करणारा लिपिक निलंबित होणार काय? व त्याच्याकडून शासकीय रक्कम वसूल करणार काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. 

     एकूणच कोविड काळात सदर लिपिकाने रुग्णालयातील व बाहेरील किती लोकांना हाताशी धरून भ्रष्टाचार केला याचे घबाड लवकरच बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर प्रकरणात लिपिकाने अटकपूर्व जामीन मिळविल्याची चर्चा रुग्णालय कर्मचारी वर्तुळात ऐकायला मिळाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top