सेवानिवृत्त शिक्षक अनंतात विलीन.
वणी:- तालुक्यातील भालर येथील सेवानिवृत्त शिक्षकाचे वयाच्या ८१ व्या वर्षी अकस्मात निधन झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताचे सुमारास घडली होती. त्यानंतर शनिवारी दुपारी बारा वाजता भालर येथील स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. Retired-teacher-merges-into-infinity.
भालर येथील गजानन नानाजी हेपट हे शिक्षक होते. मुळातच स्वाभिमानी व स्वावलंबी जीवन जगत ते स्वतःची कामे स्वतःच करीत होते. कार्यालयीन कामासाठी ते तालुक्याच्या ठिकाणी स्वतःच येऊन आपली कामे करीत होते. सेवानिवृत्ती काळात ते गावात नित्यनेमाने फेरफटका मारायला जायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले,जावई नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. शुक्रवारी दुपारचे सुमारास त्यांनी घरी जेवण केले व गावातील चौकात फेरफटका मारायला आले. त्यानंतर चौकात बसून असतांना त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. लागलीच ते चालत घरी गेले व खुर्चीवर बसून असतांनाच जमिनीवर पडले. कुटुंबीयांनी त्यांना वणी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी बारा वाजता सेवानिवृत्त शिक्षक गजानन हेपट यांचेवर भालर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसंगी बराच मोठा आप्तपरिवार उपस्थित होता.

.jpg)
%20(1).jpg)