ढाकोरी येथे दहावीत उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण
सरपंच अजय कवरासे यांचा स्तुत उपक्रम
वणी :- तालुक्यातील ढाकोरी येथे दहावीत उत्तमरीत्या गुण घेवून उत्तीर्ण झालेल्या मुलीच्या हस्ते आज २६ जानेवारी रोजी प्रजास्ताकदिना निमित्त सकाळी ९ वाजता ग्राम पंचायत येथे ध्वजारोहण करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट स्वतंत्र दिना निमित्त १२ वी मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या मुलीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येत असतात हा स्तुत्य उपक्रम येथील सरपंच अजय कवरासे यांनी सुरू केला आहे. या उपक्रमाने गावातील जनतेत कौतुकाचा विषय बनला आहे.Flag-hoisting-by-a-student-who-passed-10th-standard-with-excellent-marks-in-Dhakori
ग्राम पंचायत येथे स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन निमित्त दरवर्षी तिरंगा ध्वज फडकवला जात असतात गावातील ध्वज फडकविताना मान हा प्रथम नागरिक म्हणून सरपंच यांचा असतो परंतु मागील ४ वर्षापासून येथील सरपंच अजय कवरासे यांनी हा मान गावातील शिक्षण घेणाऱ्या मुलींमध्ये प्रेरणा मिळावी यासाठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त १२ वी मध्ये उत्कृष्ठरित्या गुण मिळवून जी मुलगी उत्तीर्ण होते, त्या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वज फडकविल्या जातो तर २६ जानेवारी प्रजासत्ताकदिना १० मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वज फडकवील्या जात आहे. आज येथील राखी कवरासे या मुलीला यावर्षी ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला आहे.
यावेळी सरपंच अजय कवरासे, शाळा सुधारक समिती उपाध्यक्ष संतोष आत्राम, पो . पा प्रभाकर कोहळे उपसरपंच शारदा शेंडे, वंदना हनुमंते, मिनानाथ काकडे, गणेश टेकाम, रुपाली खाडे , लता लसंते, तलाठी मुंडे, ग्रामसेवक मीनाक्षी चव्हाण यांचे सह असंख्य गावकरी , उपस्थित होते.