नांदेपेरा ग्रामपंचायत शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गैरव्यवहार?
वणी:- नांदेपेरा ग्रामपंचायत शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी व कार्यवाही करून झालेली परीक्षा रद्द करण्यात यावी व दुसरी परीक्षा सात दिवसाच्या आत न घेतल्यास आमरण उपोषण करीत असल्याचा इशारा परीक्षार्थी उमेदवारांनी उपविभागीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. Malpractice-in-the-examination-conducted-for-the-post-of-Nandepera-Gram-Panchayat-Peon?
वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नांदेपेरा ग्रामपंचायत येथील शिपाई पदासाठी दिनांक ३०/१२/२०२४ रोजी पंचायत समीती वणीच्या सभागृहात गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शन व विस्तार अधिकारी यांचे देखरेखीखाली परीक्षा घेण्यात आली होती. परंतु परीक्षा सुरु असतांना परीक्षकांनी रवींद्र ढवस या परीक्षार्थी ला सहकार्य करण्यासाठी चक्क बैठक व्यवस्था बदलवित रविंद्र ढवस यास शेवटच्या बेंचवर कोपऱ्यात बसविण्यात आल्याचा आरोप इतर परीक्षार्थीनी निवेदनातून केला आहे. त्याचप्रमाणे परीक्षेत देण्यात आलेली प्रश्नपत्रिका परत घेण्यात आली व अर्ध्या तासाने परीक्षकांनी सदर परीक्षेचा निकाल तोंडी जाहीर करून कोपऱ्यात बसून परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थी ला शिपाई पदी नियुक्ती देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी निवेदनातून केला आहे. हा प्रकार परीक्षार्थी म्हणुन व शिपाई पदाचा स्पर्धा परीक्षेचा पारदर्शकतेच्या नियमाच्या विरोधात आहे. परीक्षेत परीक्षकांकडुन विद्यार्थ्यांसोबत भेदभाव करणे हा भारतीय संविधानाच्या समानतेचा मुलभुत अधिकाराच्या विरोधात आहे. अशा आशयाचे निवेदन नांदेपेरा येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख सुरेश शेंडे यांच्या नेतृत्वात सचिन चिकटे, तुषार खामनकर, पवन कोडापे, अजय किन्हेकर, धीरज खामनकर, राहुल वांढरे, प्रवीण खैरे, साहिल ठमके, प्रफुल पावले आदींनी उपविभागीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांना दिले आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या
१. परीक्षेत परीक्षेत बैठक व्यवस्था बदलुन रविंद्र ढवस यास मागे कोपऱ्यात बसवुन सहकार्य केल्याने परीक्षेत घोळ झाला हे स्पष्ट होत असल्याने परीक्षा पुनश्च घेण्यात यावी.
२. रविंद्र ढवस हा नांदेपेरा ग्रामपंचायत मध्ये रोजगार सेवक म्हणून काम करीत असल्याने पदाधिका-यांशी जवळचे संबंध असल्याने त्याची नियुक्ती करण्यासाठी त्याला परीक्षेत सहकार्य करण्यात आले हे सिध्द होते आणि या करीता भ्रष्टाचार करण्यात आला असावा अशी दाट शंका दिसते. त्यामुळे संबंधित परीक्षक यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी.
3. शिपाई पदाच्या स्पर्धा परिक्षेत एम पी एम सी ची स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अभ्यासु विद्यार्थी यानी भाग घेतला असतांना ज्यांचा कधीही अभ्यासाशी संबंध आला नाही. अशा विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्यासाठी परिक्षेत सहकार्य करण्यात आले, अशी दाट परिस्थितीजन्य शक्यता दिसुन येते. करीता परीक्षा पुनश्च कॅमेऱ्याच्या निगराणीत घेण्यात यावी.
अन्यथा आमरण उपोषण..
वरील मागण्यासंदर्भात निर्णय घेऊन परीक्षार्थींना न्याय द्यावा. अन्यथा सात दिवसांपर्यंत मागण्याची पूर्तता न झाल्यास. या मागण्या घेऊन माजी ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना(उ.बा.ठा.) पक्षाचे नांदेपेरा शाखा प्रमुख सुरेश दादाजी शेंडे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करण्याचा इशारा परिक्षार्थीनी निवेदनातून दिला आहे.

%20(1).jpg)
%20(1).jpg)