राजेंद्र बच्चेवार यांचे दुःखद निधन..
वणी:- तालुक्यातील साखरा(को.) येथील माध्यमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक असलेले राजेंद्र बच्चेवार सरांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५१ व्या वर्षी दुःखद निधन झाल्याची घटना घडली आहे. Sad demise of Rajendra Bachchewar..
वणी शहरात वास्तव्यास असलेले राजेंद्र बच्चेवार हे पत्रकार क्षेत्रात दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झरी जामनी तालुक्यात कार्यरत होते. सध्या ते साखरा(कोलगाव) येथील आदर्श विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. गुरुवारी अमरावती येथे उपचारादरम्यान त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचे रवींद्र बच्चेवार, देवेंद्र बच्चेवार हे दोन्ही भाऊ शिक्षक आहेत. राजेंद्र बच्चेवार सरांचा अत्यंत मनमिळाऊ स्वभाव होता. परिणामी बराच मोठा मित्रवर्ग होता. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या दुःखद निधनाने त्यांचा परिवार व मित्रपरिवार यांचेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

.jpg)
%20(1).jpg)