जेष्ठ पत्रकार अनंतात विलीन..
वणी:- उपविभागातील मारेगाव येथील एका खाजगी शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या हिंदी विषय शिक्षकाचे रविवारी सकाळी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर मारेगाव येथील स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.Senior-journalist-merges-into-infinity..
मारेगाव येथील राष्ट्रीय विद्यालयात हिंदी विषयाचे शिक्षक हरिप्रसाद पांडे हे गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत होते. शिक्षकी सेवा दिल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. स्व. हरिप्रसाद पांडे यांच्या माठीमागे पत्नी गीतादेवी, वृत्तसमूहाचे संपादक, शैलेश पांडे, नायब तहसीलदार विवेक पांडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कल्पना माळोदे (पांडे ), प्रा. सतीश पांडे असा आप्तपरिवार आहे. सद्यःस्थित वणी तहसिल कार्यालयात कार्यरत असलेले नायब तहसीलदार, तथा गायक विवेक पांडे यांचे ते वडील वडील होते. त्यांच्या पार्थिवावर आज रविवारी मारेगाव येथील मोक्षधमावर सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.