आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकरपटाचे थाटात उद्घाटन
आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकरपटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी :- येथून जवळच असलेल्या झरिजामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीचा शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे. या पटाचे उद्धाटन वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह मात्र आमदार संजय देरकर यांना आवरता आला नाही. हा उद्धाटन सोहळा ३ जानेवारी ला सकाळी ११.३० वाजता विक्रम भोयर यांचे शेतात संपन्न झाला. Shankarpata-was-inaugurated-with-pomp-at-Adegaon-by-M.L.A.-Sanjay-Dekar.
शेतकऱ्यांमध्ये बैल जोडीचा पट हाकणे हा खेळ अत्यंत लोकप्रिय असल्याने दरवर्षी अडेगाव येथे हा पट आयोजित करण्यात येतोय. शुक्रवार पासून सुरू झालेल्या या आयोजित शंकरपटाचे उद्धाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर तर अध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणून सरपंच भास्कर सुर, प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख संतोष माहुरे, मोहन पानघटे, दिलीप भोयर, पोलिस पाटील अशोक उरकुडे, माजी सरपंच अरुण हिवरकर, तंटामुक्ती अध्यक्ष शरद काळे, विक्रम भोयर, नितेश ठाकरे, सीताराम पिंगे, दिवाकर आसुटकार, नामदेव मासिरकर, तुकाराम ठाकरे, डॉ. मासिरकर, किशोर चटप, माजी सरपंच्या सीमा लालसरे, प्रतिभा खोबरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकरपटाची जोडी हाकण्याचा मोह.
अडेगाव येथील शंकरपटाचे उद्घाटन झाल्यानंतर आमदार संजय देरकरांना पटात जोडी हाकण्याचा मोह आवरता आला नाही.