एक दिवस महिलांसाठी! हिरकणी सांस्कृतिक महोत्सव.
वणी:- धावपळीच्या जीवनातून बाहेर पडून चैतन्याचा एक दिवस महिलांच्या आनंदासाठी तसेच त्यांच्यामध्ये दडलेल्या सुप्त कलागुणांना उजाडा देण्यासाठी घेऊन येत आहे .संवाद ग्रुप प्रस्तुत हिरकणी सांस्कृतिक महोत्सव २३ फेब्रुवारी २०२५ रविवारला सकाळी १० वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह ,पाण्याच्या टाकीजवळ चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.A-day-for-women!-Hirkani-Cultural-Festival.
यामध्ये गायन, फॅशन, डान्स, मिमिक्री यासारख्या कलेचा आविष्कार असणार आहे तरी आपण या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी लवकरच आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी.. नाव नोंदणीची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२५ ही राहील. सदर कार्यक्रमात सहभाग नोंदवण्यासाठी कुठलाही शुल्क लागणार नाही.
कार्यक्रम स्थळ:- प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह पाण्याची टाकी जवळ चंद्रपूर वेळ सकाळी १० वाजता..
संपर्क करण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8554999772