दारुबंदीसाठी महिलांचा एल्गार
संगिनी न्यूज नेटवर्क:- मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सिंधी गावात सुरु असलेली अवैध दारु विक्री बंद करावी ही मागणी लावून धरत येथील महिलांचा मोर्चा थेट मारेगाव पोलीस स्टेशनवर धडकला, गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी याबाबतचे निवेदन पोलीस स्टेशनला ला दिले आहे. मात्र कुंभा येथील एका राजकीय पक्षाच्या व्यक्तीची येथे दहशत असल्याची चर्चा जोरात आहे. सोबतच लगतच असलेल्या महागाव येथे उठाव घेतला होता खरा. परंतु माशी कुठे शिंकली हे व्यवस्था जाणे.Women's-call-for-alcohol-ban
मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सिंधी गावात अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. त्यामुळे येथील गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
सिंधी येथील अंकुश महादेव वैद्य हा सिंधी पहापळ रस्त्यादरम्यान अवैधपणे दारूची खुलेआम विक्री करीत होता. दिनांक ८ फेब्रुवारीला महिलांनी त्याला दारू विकताना रंगेहात पकडले होते. मात्र सदर विक्रेत्या कडुन महिलांना शिविगाळ करुन धमकी देत असल्याच्या तक्रारी आहे. "तुमच्याकडून जे होते करा" अशा प्रकारची दमदाटी महिलांना करीत आहेत. परिणामी त्रस्त महिलांनी दिनांक ९ फेब्रुवारीला पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार पोलीस उपनिरीक्षक विकी जाधव यांना दिली. यावेळी सरपंच नीलिमा चंद्रशेखर थेरे, संतोष भाऊराव निब्रड, पोलीस पाटील, पुरुषोत्तम नानाजी भोयर, दिनेश झित्रूजी गेडाम, सोनू श्यामसुंदर ढवस, प्रियंका संदीप देवाळकर, सविता विलास नेहारे,छाया संतोष निब्रड, कुसुम डाखरे, सुरेखा म्हसे, संगीता महारतळे, कोमल डाहुले, विजया गोहोकर, प्रियंका देवाळकर, शशिकला लेडांगे, इंदुबाई लेडांगे, सोनाबाई भगत, रेखा महारतळे, लता जांभुळकर,अंजनाताई पोतराजे, सुरेखा गायकवाड, पल्लवी परचाके, मंजुषा जांभुळकर, सुनीता परचाके यांच्यासहित अनेक महिला पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होत्या.
महागावचा प्रश्न ऐरणीवरच?
मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महागाव येथील ग्रामपंचायत, महिला बचत गटाच्या सदस्यांनी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी निवेदन देत, रणशिंग फुंकले होते. त्यावेळी त्यांना समूळ दारू नष्ट करण्याचे आश्वासन ठाणेदार आणि लेखनिकांनी दिले होते. मात्र, राजकीय पक्षाच्या नेतृत्वाचा फोन आला अन गावखेड्यातील ग्रामस्थ पुढे गेलेच नाही. असे ऐकायला मिळाले.