दोनशे मीटर धावण्यात जिल्हा परिषद शाळेचा मयूर ठरला अव्वल!

0

 दोनशे मीटर धावण्यात जिल्हा परिषद शाळेचा मयूर ठरला अव्वल!

वणी:-  जिल्हास्तरीय खेळ क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा २०२४-२५  पं.स. दिग्रस येथे ५ फेब्रुवारी ला आयोजित दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत  वयोगट ६ ते ११ मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळा मानकी पंचायत समिती वणी जि. यवतमाळ. येथील मयूर अव्वल आला आहे.Mayur-of-Zilla-Parishad-School-emerged-as-the-top-winner-in-the-200-meter-run!

दोनशे मीटर धावण्यात जिल्हा परिषद शाळेचा मयूर ठरला अव्वल!

     अजूनही मैदानी खेळात ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आपले कौशल्य दाखवीत आहे.  सध्यातरी शासनाने पोषण आहारातून अंडी बाद केली आहे. परिणामी प्रथिने हवे त्या प्रमाणात जिल्हा परिषद शाळेतील मुलांना मिळत नसल्याचे सोशल मीडियावर टिप्पण्या होतांना दिसते आहे. शासनाचे ग्रामीण भागातील शाळा खच्चीकरण करण्याचे षड्यंत्र या सर्व बाबीला झुगारून, वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद डिजिटल शाळा मानकी येथील मयूर प्रवीण काकडे या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय खेळ क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा २०२४-२५  पं.स. दिग्रस येथे ५ फेब्रुवारी ला आयोजित दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत  वयोगट ६ ते ११ मध्ये  प्रथम स्थान पटकाविले आहे. त्याने विजयाचे श्रेय! आईवडील, प्रशिक्षक,मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आदींना दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top