समुह नृत्य स्पर्धेत मारेगाव चमु प्रथम
वणी:-(मारेगाव)
जिल्हा परिषद कर्मचारी क्रिडा मंडळ यवतमाळच्या वतीने आयोजीत 2024-25 च्या सांस्कृतिक स्पर्धेत मारेगांव पंचायत समितीच्या चमुने प्रथम क्रमांक पटकावला आहे. Maregaon-Chamu-wins-first-place-in-group-dance-competition
नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे क्रिडा व सांस्कृतीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच पार पडलेल्या सांस्कृतिक स्पर्धे मध्ये जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. जिल्हा स्तरीय आयोजीत क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत संपूर्ण पंचायत समितीच्या जिल्हा परिषद कर्मचारी कलावंतांनी विविध कलेने रंगमंच गाजवला होता. सहभागी स्पर्धका मधुन मारेगावच्या चमुने समुह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धकांनी आपल्या कलेचे उत्कृष्ट सादरीकरण करुन रंगमंच जिंकला आहे. मारेगांव पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच कला क्षेत्रात सन्मानाचे स्थान मिळवुन दिल्यामुळे या कलावंताचे कौतुक होत आहे. विजयी कलावंतां मध्ये मारेगाव पंचायत समितीच्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षीका कु.चित्रा डहाके,कु.माधुरी लोहकरे,कु.जयश्री चव्हाण,कु.पुजा गोडबोले,कु.मिना पिसे,कु.सुजाता मेश्राम,कु.अश्विनी कावरे,कु. भाग्यश्री भोमले,कु.संयोगिता चिरडे,कु.अनिता डेकाटे व आरोग्य विभागाच्या राजश्री तिडके ईत्यादिंनी सहभाग घेतला होता.
आता विभागीय स्पर्धा!...
जिल्हा स्तरावर पहिल्यांदाच मारेगाव पंचायत समितीने प्रथम क्रमांक पटकाविल्याने त्यांना विभागीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पुढच्या स्पर्धेसाठी त्यांना आता पासुनच तालीम करावी लागणार आहे.
वणीचा गट मागे का?
अनेक स्पर्धेत सहभागी होणारा वणी पंचायत समिती कार्यक्षेत्रातील अवल्ल असलेला नृत्य गट मागे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होते आहे.