जिरे, ओवा, बडीशेप आरोग्यासाठी किती लाभदायक!
वणी:- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात बाहेरचे पदार्थ, रासायनिक प्रक्रिया केलेले अन्न व व्यायामाचा अभाव आदी कारणामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. आणि यात सर्वात जास्त प्रमाणात पोटाचे विकार, वाढलेले पोट,चरबी,गॅस, पोटदुखी अशा अनेक तक्रारी बघायला मिळते आहे. यासाठीच आपल्या स्वयंपाकघरात असलेले पदार्थ या व्याधीसाठी संजीवनी ठरणार आहे. Cumin,-ova,-sopam-are-so-beneficial-for-health!
प्रथम जिरे, ओवा,सोपं, (बडीशेप)यांची माहिती घेऊयात.
जिरे :- जे नेहमी भाजी तयार करतांना वापरतो. जिरे शरीरासाठी खूप लाभदायक आहे. पोटात वायू तयार होणे, वारंवार ढेकर येणे, अपचन, सोबतच वाढलेली चरबी लघवीला त्रास होणे. आदींसाठी उपयुक्त आहे.
ओवा:- जेवण झाल्यावर बऱ्याच घरात ओवा,सोपं खातात. ओवा म्हणजे पोटात तयार झालेले जंत, घशातील खवखव, पोटदुखी आदी आजार दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
सोपं:-(बडीशेप) जेवणानंतर खाण्यात येणारी सोपं म्हणजे खाल्लेले अन्न पचविण्यासाठी, आतडी स्वच्छ करण्यासाठी, पोट स्वच्छ राहून आरोग्य निरोगी राहण्यासाठी आणि विशेष म्हणजे मुखशुद्धी करण्यासाठी आपण सेवन करतो. सोप सेवन केल्याने बऱ्याच पोटाच्या तक्रारी दूर होतात. पण त्याचा उपयोग कसा करायचा ते आपण खाली दिलेल्या कृतीतून करूयात!
जिरे, ओवा, सोपं यांचे मिश्रण करण्याची कृती.
एक चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, एक चमचा सोपं घेऊन ते मिश्रण एक ग्लास पाण्यात टाकावे. आणि गॅसवर एक भांडे ठेऊन त्यात हे मिश्रण टाकून मंद आचेवर साधारण एक कप मिश्रण राहील तोपर्यंत उकळून घ्यावे. व तयार झालेला काढा कोमट झाल्यावर गाळून घ्यावा.
काढा कसा घ्यावा.
सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री जेवणानंतर काढा नियमित घेतल्याने वाढलेले पोट,अपचन,अवाजवी चरबी,पोटदुखी यासारखे आजार राहणार नाही. पोट साफ तर आरोग्य चांगले. सोबतच पोटातील आतडी व घाण स्वच्छ होईल. करून बघा फायदाच होईल.