तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र पूर्ववत सुरू करण्याची मागणी

0

 तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र पूर्ववत सुरू करण्याची मागणी

वणी:-  तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र मागील  दोन महिन्यांपासून बंद असल्याने जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. बंद असलेले सेतू सुविधा केंद्र पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.Demand-to-restore-the-Setu-Suvidha-Center-in-the-tehsil-area

तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र पूर्ववत सुरू करण्याची मागणी


वणी तहसील कार्यालय परिसरात असलेले सेतु सुविधा केंद्र गेल्या दोन महीन्यापासुन बंद आहे. बहुतांश नागरीक या सेतु सुविधा केंद्रातुन सेवा घेत होते. सदर सेतुची सुविधा ही चांगली व प्रामाणिक होती. यामध्ये अनेक प्रकारचे कागदपत्र त्यांना या सेतु सुविधा केंद्रातुन मिळत होते.  परंतु गेल्या दोन महिन्या-पासून सदर सेतु सुविधा केंद्र बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला शासकीय कागदपत्रे, घेण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी ग्रामीण भागातील जनतेला आल्या पावलीच परत जावे लागत आहे.  परिणामी त्यांना आर्थीक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तहसिल परीसरातील असलेले सेतु सुविधा केंद्र यावर जनतेचा विश्वास असल्यामुळे नागरिक इतर कुठेही न जाता शासकीय कार्यालयातच कागदपत्रे काढण्याकरता येत असतात.  परंतु कागदपत्रे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीना गेल्या दोन महिन्यापासुन सेतु सुविधा केंद्र बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.  जनतेच्या समस्या लक्ष्यात घेता वणी तहसिल कार्यालयातील सेतु सुविधा केंद्र  पूर्ववत सुरू करून जनतेला सेवा प्रदान करण्यात अशा आशयाचे निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे  कॉ. ऍड कुमार मोहरमपुरी, कॉ ऍड. दिलीप परचाके, कॉ. कवडू चांदेकर, ऍड. विप्लव तेलतुंबडे, ऍड. प्रवीण पुरी सोबतच सामाजिक कार्यकर्ते अब्दुल निसार, गुलाम रसूल, अहेमद खा, मूनवर खा सह अनेकांच्या स्वाक्षरीने उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top