घरीच तयार करा चविष्ट गरम मसाला

0

 घरीच तयार करा चविष्ट गरम मसाला

वणी:-   सध्या आपण बाजारातील विविध कंपन्यांनी तयार केलेले मसाले वापरतो.  पण घरी बनवलेला मसाला व विकतचा मसाला यात खूप फरक जाणवतो. सोबतच घरी तयार केलेल्या मसाल्याला उत्तम स्वादिष्ट चव असते. त्यामुळे बाजारातील मसाले या घरच्या मसाल्यापुढे काहीच नाही. म्हणूनच

 जर आपल्याला घरीच गरम मसाला तयार करायचा असेल तर, आपण या पद्धतीने गरम मसाला तयार करू शकता. घरच्या खडा मसाल्याचा वापर करून गरम मसाला झटपट तयार होतो. Make-delicious-garam-masala-at-home

घरीच तयार करा चविष्ट गरम मसाला


त्यासाठी लागणारे खडे मसाले.(साहित्य)

    धणे,जिरे,काळी मिरी, गदा फूल,दगडफूल, चक्रफूल, हळकुंड, वेलची, जायफळ, दालचिनी, सुकी लाल काश्मिरी, खसखस, तमालपत्र, बडीशेप, सैंधव मीठ, हिंग, कसुरी मेथी, 


स्वादिष्ट गरम मसाला तयार करण्याची कृती.

    सर्वप्रथम, कढई गरम करण्यासाठी ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात एक कप धणे घाला. नंतर त्यात एक टेबलस्पून जिरे, काळे जिरे, एक टेबलस्पून काळी मिरी, ५ ते ६ लवंगा, एक गदा फूल, एक दगडफूल, एक चक्रफूल, २ इंच हळकुंड, ६ ते ७ वेलची, एक जायफळ, ३ इंच दालचिनी, ३ सुकी काश्मिरी लाल मिरची, अर्धा टेबलस्पून खसखस, २ तमालपत्र, अर्धा चमचा बडीशेप, एक टेबलस्पून सैंधव मीठ आणि चिमुटभर हिंग घालून एकत्र करा. एकत्र केलेले खडे मसाले, ७ ते ८ मिनिटांसाठी मध्यम आचेवर सगळे मसाले भाजून घ्या. मसाले भाजून घेतल्यानंतर थोडं थंड करण्यासाठी ठेवा. भाजलेले मसाले थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले मसाले घालून बारीक करून घ्या. नंतर त्यात एक चमचा कसुरी मेथी घालून बारीक करा. व बारीक झालेले मसाले चाळणी करून घ्या. जाड राहिलेले मसाले परत बारीक करून घ्या. आणि अशा प्रकारे घरगुती स्वादिष्ट गरम मसाला भाजीत वापरण्यासाठी तयार.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top