अल्पभूधारक युवा शेतकऱ्याची आत्महत्या.
मारेगाव:- (वणी) पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या केगाव (वेगाव) येथील ३५ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. Suicide-of-a-young-smallholder-farmer.
पवन आण्याजी पिंपळशेंडे 35 असे आत्महत्या केलेल्या केगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नाव आहे. पवन गेल्या कित्येक दिवसांपासून नैराश्यात जिवण जगत होता. त्याच्याकडे तीन एकर शेती होती. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. बँक व खाजगी कर्ज असल्याने तो सतत नैराश्यात असल्याची माहिती आहे. ११ फेब्रुवारी ला सकाळी सहा वाजता शेतात जातो म्हणून घरून गेला होता. सकाळी १० वाजता चे सुमारास भाऊसून अनिता पिपंळशेंडे ही शेतात गेली असता पवन हा शेतात विषारी औषध प्राशन करून मृतावस्थेत आढळून आल्याचे अनिताने नातेवाईकांना कळवले . सदर घटनेची तक्रार पवनचे काका भास्कर नामदेव जोगी यांनी पोलिसात दिली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीणीय तपासणी करीता मारेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविला होता. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे. पवनच्या पश्चात आई पत्नी व एक पाच वर्षाचा मुलगा आहे.