शेतकऱ्याची रक्कम उडविणारा वणी पोलिसांच्या जाळ्यात.
वणी:- कापसाच्या विक्रीतून मिळालेले ९० हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास दिपक टॉकीज परीसरातील एका बार समोर घडली होती. शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत आरोपीचा शोध घेत त्याला गजाआड केले आहे.The-man-who-embezzled-the-farmer's-money-is-caught-by-the-police.
सचिन संजय देवतळे २६ रा. गाडेघाट ता. कोरपणा जिल्हा. चंद्रपुर या शेतकऱ्याने ८ फेब्रुवारी ला वणी येथे कापूस विकला. कापसाची रक्कम घेऊन पिकअप मध्ये ठेवली होती. शहरातील दीपक चौपाटी परिसरात चहा घेण्यासाठी थांबला असतांना अज्ञात चोरट्याने संधी साधून ९० हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली होती. यासंबंधी वणी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करून तपासात घेतला.
वणी पोलिसांनी तात्काळ परिसरातील सिसीटिव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजच्या आधारे संशयित आरोपी सुरज अशोक घोसे ३३ वर्ष रा. रामपुरा वार्ड वणी याला ताब्यात घेऊन पोलिसाचा हिसका दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुल दिली. व चोरी केलेली ९० हजार रुपयांची रक्कम परत केली. सोबतच गुन्ह्यात वापरलेली मोपेड सुद्धा जप्त केली.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे, ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डिबी पथक प्रमुख पि.एस.आय धिरज गुल्हाने, पोका. गजानन कुळमेथे, निरंजन खिरटकर, मुनेश्वर खंडरे, वसीम खान यांनी केली.