महाविकास आघाडीच्या खासदारांची संसद भवन परिसरात निदर्शने.
सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ, व योग्य भाव देण्याची मागणी.
वणी:- (संगिनी न्यूज नेटवर्क)
महाराष्ट्रातील शेतकरी शेतमालाच्या पडत्या दरामुळे मोठ्या अडचणीत आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही. सोयाबीनला भाव नाही. शासकीय खरेदी वारंवार बंद, आदी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य भाव, सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरीत महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसद भवन परिसरात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली आहे. Protests-by-Mahavikas-Aghadi-MPs-in-the-Parliament-building-area.
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी शासनाच्या वेळकाढूपणामुळे अडचणीत सापडला आहे. राज्यातील 'नाफेड'च्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केला जात आहे. यासाठी नोंदणी करुनही अनेक शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ आणि योग्य खरेदीमूल्य देण्याची आवश्यकता आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक असून मुदतवाढ मिळाली नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे . शेतकऱ्यांचा हा आवाज शासनाच्या कानापर्यंत पोहोचविण्यासाठी महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदभवन परिसरात निदर्शने करुन घोषणा दिल्या. शासनाने याची दखल घेऊन तातडीने सोयाबीन खरेदीला मुदतवाढ आता योग्य तो भाव द्यावा. या आंदोलनात खासदार ओमराजे निंबाळकर, निलेश लंके, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, विशाल पाटील, प्रतिभा धानोरकर, कल्याण काळे, प्रशांत पडोळे, बळवंत वानखेडे, शिवाजी काळगे उपस्थित होते. (सौजन्य :-महाविकास} आघाडी)

%20(1).jpg)