गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या.
मारेगाव तालुक्यात सलग दोन तरुणांची आत्महत्या.
वणी:- मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नवरगाव येथील २६ वर्षीय तरुणाने नैराश्येतुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ फेब्रुवारी ला घडली आहे. Youth-commits-suicide-by-hanging
मारेगाव तालुक्यातील नवरगाव (धरण ) येथील कपिल रवींद्र परचाके या मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या कामगार तरुणाने स्वतःच्या राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिवसभर काम करून त्याचा मोठा भाऊ घरी आला तेव्हा कपिल गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेची माहिती पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलविला.
सलग दोन दिवसात मारेगाव तालुक्यातील केगाव व नवरगाव येथील तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या असल्याने तालुका पुरता हादरला आहे. दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढते आहे. वाढती महागाई याला कारणीभूत असल्याचे या घटनांवरून दिसते आहे.

