-->

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी, मृत झालेल्यांना वनविभागाचे अर्थसहाय्य.

0

 वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी, मृत झालेल्यांना वनविभागाचे अर्थसहाय्य.

वनविभागाच्या ४३ स्वरूपाच्या ऑनलाइन सुविधा

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने ४३ स्वरूपाच्या ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.  यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीला २० लाखाचे अर्थसहाय्य मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय वनविभागाने त्यांच्या पोर्टलवर केली आहे. Forest Department provides financial assistance to those injured and killed in wild animal attacks.

वनविभागाच्या ४३ स्वरूपाच्या ऑनलाइन सुविधा

     वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अथवा मृत झालेल्या व्यक्तीस तसेच जनावरे मृत अथवा जखमी झाल्यास वनविभागाने अर्थसहाय्य देण्याची तरतूद केली आहे.  
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जनावरे / मनुष्य जखमी / मृत झाल्यास भरपाईसाठी, खालील प्रकारे तरतूद केली आहे.
मनुष्य मृत्यू झाल्यास 20 लाख रुपये. गाय / म्हैस / बैल मृत्यू झाल्यास 70 हजार रुपये. मेंढी / बकरी/शेळीचा मृत्यू झाल्यास 15 हजार रुपये. असे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.  त्यासाठी वनविभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.

वन विभागाच्या ऑनलाईन सुविधा 

शेतातील अथवा इतर जागेतील झाडे तोडण्याची परवानगी घेण्यासाठी व कोणत्याही प्रकारचे विविध दाखले मिळविण्यासाठी विविध स्वरूपाच्या 43 सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध आहेत.  त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून वनविभागाच्या योजना व अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.  intranet.mahaforest.gov.in/forestportal/
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत झालेल्या व्यक्ती, जनावरे यांची माहिती देऊन आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी अर्ज दाखल करावा.  intranet.mahaforest.gov.in/forestportal/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top