वणीत शिवसेना (उ.बा.ठा.) महिला आघाडीचा पाकिस्तानविरोधी संताप;
"माझं कुंकू – माझा देश" च्या घोषणांनी चौक दणाणला.
वणी:- भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना खेळविण्याचा निर्णय जाहीर होताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने आज वणी शहरात संतप्त आंदोलन उभं राहिलं. "माझं कुंकू – माझा देश" या हाकेला मोठ्या संख्येने महिलांनी प्रतिसाद देत छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित येत पाकिस्तानविरोधी घोषणांनी चौक दणाणून सोडला.Shiv Sena, UP Women's Front express anger against Pakistan in Wani
प्रतीकात्मक संताप
किरण देरकर यांनी प्रतीकात्मक संताप व्यक्त करत चौकात टीव्ही फोडला. त्यानंतर महिलांनी क्रिकेट सामन्याचे प्रतीक म्हणून बॅट, बॉल आणि स्टम्प जाळून पाकिस्तानविरोधी निषेध नोंदवला. प्रसंगी जय शाह यांच्या विरोधातही महिलांनी तीव्र घोषणाबाजी केली.
महिला आघाडीच्या नेत्या म्हणाल्या, “पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असतानाही भारत–पाकिस्तान सामना खेळणे म्हणजे शहीद सैनिकांच्या विधवांचा अपमान आहे. सरकारने या बहिणींच्या भावनांचा क्रूर छळ केलेला आहे व याची या दुटप्पी धोरणाच्या सरकारला किंमत चुकवावी लागणार आहे.
आंदोलनामुळे वणी शहरात वातावरण तापले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेल्या महिलांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. प्रसंगी महिला उपजिल्हा संघटिका डिमनताई टोंगे, सरपंच गीताताई उपरे,इंदुताई किन्हेकर, सरपंच रूपाली कातकड़े ,सुरेखा ढेंगळे, सुरेखा भोयर, पौर्णिमा राजुरकर, सविता आवारी, सुनंदा गुहे, शारदा चिंतकुंतलवार,रेखा बोबड़े,अर्चना पिदुरकर,पौर्णिमा भोंगळे,जिजाताई वरारकर, अरुणा कूचनकार, अमीना पठाण, यमुना हिरादेवे, रजनी टोंगे, किर्तीताई देशकर, संध्या कोकास, प्रगती घोटेकर, शुभांगी ठाकरे,मनिषा टोंगे , विद्या कालेकर, मीनाक्षी मोहिते, माधुरी सुंकूरवार , रेश्मा कातरकर, शुभांगी टोंगे, प्रभा खाडे, शालिनी देरकर, मीनाक्षी गायकवाड,सुजाता ठाकरे,विशाखा चौधरी,भोयर उषा सुर, भाग्यश्री जुनगरी, मनिषा बोबडे, सविता दोडके सह वणी विधानसभा क्षेत्रातील वणी-झरी-मारेगांव शिवसेना महिला आघाडीच्या समस्त महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

.jpg)