-->

पानपट्टी समोर दुचाकी ठेवल्याने एकावर नऊ जणांचा हल्ला

0

 पानपट्टी समोर दुचाकी ठेवल्याने एकावर नऊ जणांचा हल्ला

वणी पोलिसांत गुन्हा दाखल, तरुण गंभीर जखमी

वणी:-  शहरातील पानपट्टी समोर दुचाकी उभी केल्याच्या कारणावरून एका तरुणास तब्बल नऊ जणांनी काठ्या व लोखंडी रॉडणे मारहाण करीत हल्ला केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nine people attacked a man for parking his bike in front of a roadside stall

पानपट्टी समोर दुचाकी ठेवल्याने एकावर नऊ जणांचा हल्ला

     शहरातील सेवा नगर परिसरातील अंकुश मोगरे हा सोमवारी रात्री पावणे बारा च्या सुमारास पानपट्टी समोर आला होता.  अंकुश ने त्याची दुचाकी पानपट्टी समोर उभी केली.  पानपट्टीसमोर दुचाकी का उभी केली म्हणून तेथे असलेल्या 1) विलास चौहाण, 2) विशाल चौहाण, 3) सुर्यभान चौहाण, 4) विरसिंग उर्फ विरु लीवारे, 5) दुर्गेश उर्फ सोनु चौहाण 6) अथर्व उईके 7) दोन अनोळखी तरुणांनी संगनमत करून अंकुश मोगरे यांचे सोबत पानठेला समोर गाडी लावण्याचे कारणावरून वाद विवाद करून हातातील काठ्यांने व लोखडी रॉडने अंकूश मोगरे याचे डोक्यावर, पाठीवर, हाता-पायावर मारून गंभिर जखमी केले.  त्यानंतर अंकुश तेथून पळून पोलीस स्टेशनकडे येत असतांना नऊ आरोपीतांनी त्याचा पाठलाग करून त्यास तहसिल कार्यालयाचे बाजूचे जी.आर नास्टा सेंटर समोरील सिमेंट रोडवर खाली पाडून विशाल चव्हाण याने अंकूश याचे डोक्यावर जिवाने ठार मारण्याचे उद्देशाने काठीने वारंवार मारहाण करून गंभिर जखमी केले अशा आशयाची तक्रार भोलेश्वर नारायण ताराचंद, वय 40 वर्ष, व्यवसाय नौकरी (नगर परिषद वणी) रा. सेवानगर वणी. यांनी  पोलिसांत दिल्यावरून 1) विलास चौहाण, 2) विशाल चौहाण, 3) सुर्यभान चौहाण, 4) विरसिंग उर्फ विरु लीवारे, 5) दुर्गेश उर्फ सोनु चौहाण दोन अनोळखी तरुणा विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109,189(1),189(2),189(3),189(4),190,191 (1), 191(2),191(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे.  पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे करीत आहेत.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top