काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षाचे अकस्मात निधन
वणी:- शहराचे काँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्षाचे अकस्मात निधन झाल्याची घटना बुधवारी एक ऑक्टोबर ला सकाळी साडेअकरा वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे. Former Congress city president passes away suddenly
मागील काळात काँगेस कमिटीचे अध्यक्ष राहिलेले राजाभाऊ पाथ्रडकर हे स्थानिक जैताई मंदिरात महाप्रसाद वाटप करीत असतांना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तात्काळ येथील सुगम हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांची प्राणज्योत मालवली होती.
नेहमी सर्व कार्यक्रमात हिरीरीने सहभाग नोंदविणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड झाल्याने सर्व स्तरातून दुःख व्यक्त होत आहे.
नेहमी सर्व कार्यक्रमात हिरीरीने सहभाग नोंदविणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड झाल्याने सर्व स्तरातून दुःख व्यक्त होत आहे.