पोलीस हवालदाराचा हृदयविकाराने मृत्यू.
यवतमाळ जिल्हा पोलीस दलात हळहळ
वणी :- यवतमाळ जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या ४५ वर्षीय पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना ७ सप्टेंबर ला सायंकाळी उघडकीस आली आहे. Police constable dies of heart attack.
वणी उपविभागातील मुकुटंबन पोलीस ठाण्यात वणी येथील काळे लेआऊट भागात राहणारे उमेश विठ्ठलराव डोंगरे यांच्या छातीत दुखू लागल्याने ते ६ सप्टेंबरला नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले होते. सात तारखेला सकाळी अकरा वाजता अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले त्यातच त्यांना तीव्र हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्यांचे निधन झाले.
त्यांच्या मृत्यूने पोलीस विभागात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे मागे आई- वडील पत्नी, भाऊ असा बराच आप्त परिवार आहे. त्यांचे पार्थिव दिनांक ८ सप्टेंबरला दुपारी दोन वाजेपर्यंत वणीत येणार असून सायंकाळी वणी येथील मोक्षधाम येथे त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.