-->

मनसेच्या बड्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल.

0

 मनसेच्या बड्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल.

साथीदारांसह नेता फरारी


वणी(यवतमाळ):- विधानसभा क्षेत्रातील रस्त्याच्या बांधकामावर साथीदारांसह जाऊन तेथील लोकांना धमकावून मारहाण करीत मनसेच्या राज्य उपाध्यक्षाने चंद्रपूरच्या कंत्राटदाराला थेट रस्ता बांधकामात चार टक्क्यानुसार साडे नऊ कोटींच्या खंडणीची मागणी करत मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली.  या प्रकरणाचे केवळ वणीतच नव्हे तर जिल्हाभरात पडसाद उमटले. अखेर फिर्यादीच्या तक्रारीनंतर वणी पोलिसांनी मनसेच्या या 'बड्या' नेत्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले. सध्या हा खंडणीखोर नेता वणी पोलीस दप्तरी 'फरारी' असल्याची नोंद केली आहे. A case of extortion has been registered against a senior MNS leader.

मनसेच्या बड्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल.

     राजू मधुकर उंबरकर रा. वणी असे खंडणीबहाद्दर आरोपीचे नाव आहे. उंबरकर हे मनसेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून वर्तमान स्थितीत कार्यरत आहेत.  चंद्रपूर येथील योगेश जयंत मामीडवार या कंत्राटदाराच्या तक्रारीवरून राजकीय वर्तुळात 'गवगवा' असणाऱ्या राजू उंबरकरवर वणी पोलिसांनी जीवे मारण्याच्या उद्देशासह गंभीर दुखापत करणे व खंडणी मागणे या अंतर्गत भादंवी १३८ (५) नुसार गुन्हे नोंदविले आहेत. स्थानिक माहितीनुसार योगेश जयंत मामीडवार (३३) (कंत्राटदार) रा. गजानन महाराज मंदिर जवळ वडगाव रोड चंद्रपूर यांनी या संदर्भात रितसर तक्रार केली. त्यांचे वडील जयंत मामीडवार हे गजानन कंस्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा आहेत. 
     शिबला ते वणी आणि वणी ते नांदेपेरा या रस्त्याच्या सिमेंट बांधकामाचा कंत्राट शासनाने गजानन कंस्ट्रक्शन कंपनीला मंजूर केला. शासनाच्या वर्क ऑडर प्रमाणे सात महिन्यापूर्वीच या मार्गावरचे काम सुरू झाले. दरम्यान १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सुमारास त्यांच्या कंपनीचे व्यवस्थापक अजय हिंगाणे हे अधिनस्त कामगारांसह घोन्सा गावाजवळ रस्ता बांधकाम करीत होते. त्याच वेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे त्या ठिकाणी आले. त्यांनी व्यवस्थापकासह निरपेंद्र पाटील, सागर तन्नेरवार, कुलदिप पांडे, आकाश उईके यांच्याशी बाचाबाची करीत त्यांच्या अंगावर धावून गेले. वणी पंचक्रोशित कुठलेही काम करायचे असल्यास चार टक्के कमिशन दिल्याशिवाय काम होत नाही, असा सज्जड दम भरत त्यांनी मारहाण केली.  त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी आरोपी उंबरकरने त्याच्या घरी बोलविले. त्या ठिकाणी तब्बल साडे नऊ कोटींची 'कमिशन' बेसवर खंडणी मागितली गेली.
    तेव्हा फियांदी यांनी १० लाख रुपये आरोपी उंबरकरांकडे सुपूर्द केले. 'तुझे काम माझ्या हद्दीत सुरू आहे, आज पर्यंत तु मला भेटायला आला नाही. चार टक्के प्रमाणे साडे नऊ कोटी रूपये मला लागतील, ही रक्कम तुला द्यावी लागेल, अन्य माझे कार्यकर्ते तुझे काम चालू देणार नाही.' अशी जीवे मारण्याची धमकी दिली.  विशेष म्हणजे आरोपी राजू उंबरकर याच्या दोन ते तीन हस्तकांनी थेट मोबाईलवरून कंत्राटदाराला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत नमूद आहे. 

    

धमकीचा कॉल करणारे पोलिसांच्या 'रडार'वर


     कंत्राटदाराकडून खंडणी स्वरूपात अग्रीम रक्कम म्हणून १० लाख रुपये उकळल्यानंतर उर्वरीत रकमेसाठी मामीडवार यांच्या मोबाइलवर सातत्याने 'कॉल करणारे आरोपी उंबरकरांचे आणखी साथीदार वणी पोलिसांच्या रडारवर आहेत. मामीडवार यांच्या मोबाइलवर आलेले 'कॉल्स' 'सीडीआर'च्या माध्यमातून पोलीस यंत्रणा तांत्रिक तपास पद्धतीतून शोधत आहेत.  या प्रकरणामुळे वणीच्या पंचक्रोशीत अवैध कोळसा वाहतूकीसह इतर धंद्यांमध्ये सदर 'नेत्यां 'कडून चालणारी किंबहूना मागविली जाणारी 'टक्केवारी' चव्हाट्यावर आली आहे.

     एकूणच हा सर्वच प्रकार अंत्यत गंभीर असून स्वतःला 'लोकनेता' म्हणवून घेणाऱ्याचे 'पितळ' उघडे पडल्याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळासह जनमाणसात सुरू आहे. 


स्वयंघोषित नेता फरार

कंत्राटदाराच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केल्यानंतर स्वयंघोषित नेता फरार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top