महाभारत मालिकेत कर्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे निधन
वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संगिनी न्यूज:- बी आर चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेत कर्णाची भूमिका साकारणारे पंकज धीर यांचे मुंबईत कर्करोगाच्या आजाराने वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. Actor who played the role of Karna in the Mahabharata series passes away #Pankaj Dheer
पूर्वी दूरचित्रवाणी वर गाजणारी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालिके पैकी बी आर चोप्रा यांची "महाभारत" ही मालिका खूपच गाजली होती. या मालिकेत दानशूर कर्णाची भूमिका साकारणारे कलाकार पंकज धीर.
कधी कधी काही व्यक्तिरेखा इतक्या प्रभावी असतात की त्या केवळ अभिनयापुरत्या मर्यादित राहत नाहीत. त्या काळाच्या पलीकडे जातात, मनात घर करतात. पंकज धीर हे असेच एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व. बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्ये त्यांनी साकारलेला कर्ण आजही लाखो प्रेक्षकांच्या हृदयात जिवंत आहे. त्याच्या नजरेतील करुणा, आवाजातील ठामपणा आणि चेहऱ्यावरची निष्ठा, हे सगळं अजूनही आठवणींमध्ये ताजं आहे.
‘चंद्रकांता’मधील शिवदत्त असो किंवा इतर अनेक भूमिका—पंकज धीर यांनी प्रत्येक पात्राला आत्मा दिला. त्यांच्या जाण्यानं एक युग संपलंय असं वाटतं. अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे आणि ते सदैव स्मरणात राहील.
आज आपण पंकज धीर सारखा एक महान कलाकार गमावला आहे, पण त्यांच्या आठवणी, संवाद आणि सादरीकरणं आपल्याला पुन्हा पुन्हा त्यांचं अस्तित्व जाणवून देतील.