जीएस कंपनी परिसरात आढळला तरुणाचा मृतदेह
हत्या झाल्याचा दाट संशय?
वणी:- पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जीएस ऑइल कंपनीच्या आवारातील पाण्याच्या उघड्या टाकीत ३५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. परिणामी हत्या झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरविली आहे. Body of a young man found in GS Company area
शहरापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या भालर मार्गावरील जीएस ऑइल कंपनीच्या आवारातील पाण्याच्या उघड्या टाक्यात नवीन वागदरा येथील मनोज वानखडे या ३५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह बुधवारी दुपारी बारा वाजताचे सुमारास आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते. मनोजची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी तपासचक्रे फिरविली आहे.
मंगळवारी मनोज च्या कुटुंबीयांनी मनोज बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिल्याचे समजते. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे.
मंगळवारी मनोज च्या कुटुंबीयांनी मनोज बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिल्याचे समजते. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे.
सदर घटनेला अनैतिक संबंधाची किनार?
घटनास्थळी शेकडो लोकांचा जनसमुदाय उपस्थित झाला होता. यातच या घटनेला अनैतिक संबंध असल्याची किनार असल्याचा संशय व्यक्त होत होता. यावरून पोलिसांना तपासाची दिशा गवसली असल्याची शक्यता आहे.

