-->

वेल्हाळा नांदेपेरा गटात इच्छुकांची भाऊगर्दी

0

 वेल्हाळा नांदेपेरा गटात इच्छुकांची भाऊगर्दी

महिलाही रणांगणात उतरण्याची शक्यता

वणी:-  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती गट, गणाचे आरक्षण जाहीर होताच प्रमुख पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी तिकीट मिळविण्यासाठी भाऊगर्दी केल्याचे बघायला मिळते आहे.  इच्छुक उमेदवारांच्या भाऊगर्दीत महिलाही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने तिकीट वाटपात नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे.

Crowd of aspirants in Velhala Nandepera group.


वेल्हाळा नांदेपेरा गटात इच्छुकांची भाऊगर्दी

     नुकतेच जिल्हा परिषद, पंचायत समिती गट गणाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.  आरक्षण जाहीर होताच प्रमुख राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचा ज्वर भरला आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना(ठाकरे), शिवसेना(शिंदे) भाजप,व्हीबीए मधील इच्छुक उमेदवारांनी कंबर कसत उमेदवारी मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे. परिणामी उमेदवारी देतांना तिकीट वाटप करणाऱ्या नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे. 


शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रबळ दावेदार


      वेल्हाळा-नांदेपेरा जिल्हा परिषद गटात शिवसेना ठाकरे पक्षातील इच्छुकांची भाऊगर्दी चांगलीच वाढली आहे.  यात विद्यमान आमदार संजय देरकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे संजय देठे प्रमुख दावेदार असल्याचे बोलल्या जात आहे.  गेल्या तीस वर्षांपासून आमदारांचे निष्ठावंत असल्याने गावागावात त्यांचे समर्थक आहे.  सहकार क्षेत्रातील अनुभव ओळख हीच जमेची बाजू मांडत संजय देठे हे प्रबळ दावेदार असल्याचे सूर ऐकायला मिळते आहे.        तर दुसरीकडे माजी पंचायत समिती सदस्य टिकाराम खाडे हे सुद्धा जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.  मात्र त्यांचा मूळ गाव लगतच्या तरोडा-शिंदोला गटात आहे. 
      नांदेपेरा-वेल्हाळा जिल्हा परिषद गटात महिला सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे.  सोबतच अनेक इच्छुक नेत्यांशी जवळीक साधून आहेत.  परिणामी स्थानिक नेत्यांचे पाठबळ कोणाला मिळते यावर सर्व अवलंबून आहे.  सोबतच संजय देठे  यांच्या पत्नी वैशाली देठे सुद्धा निवडणूक लढण्यास उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. आता पक्ष कोणाला उमेदवारी जाहीर करणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top