-->

वणीतील एका लेआऊट मध्ये आणखी एक खुनाची घटना

0

 वणीतील एका लेआऊट मध्ये आणखी एक खुनाची घटना


गुन्हेगारीच्या घटनांत सातत्याने वाढ


वणी: /  पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वडगांव रोड लगत असलेल्या एका लेआऊट मध्ये ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह शुक्रवार २४ ऑक्टोबर ला दुपारचे सुमारास एका गुराख्याला आढळून आला आहे.  मृतकाच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याने सदरचा खुनच असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. Another murder incident in a layout in Wani

वणीतील एका लेआऊट मध्ये आणखी एक खुनाची घटना

     शहरालगत असलेल्या वडगांव रोडवरील गजानन नगरी परिसरात गुरे चारणाऱ्या गुराख्याला शुक्रवारी दुपारी गुरे चारत असतांना एका तरुणाचा मृतदेह जखमी अवस्थेत आढळून आला.  या घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळाली.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.  त्यानंतर फॉरेन्सिक लॅब चमुला पाचारण करण्यात आले होते.  यात मृतकाच्या मानेवर व शरीरावर गंभीर जखमा असल्याने सदरचा खुनच असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.  मृतदेहाची लगेच ओळख पटली मृतक वणी शहरातील रंगनाथ नगर भागातील स्वप्नील किशोर राऊत असल्याचे स्पष्ट झाले.  

ठाणेदार, डीवायएसपी घटनास्थळी दाखल

     घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सुरेश दळवे, ठाणेदार गोपाल उंबरकर चमुसह घटनास्थळी दाखल झाले.  घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली.  सोबतच फॉरेन्सिक लॅब चमुला पाचारण केले.  सदरची घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास सुरू आहे.

खुनाच्या घटनेत सातत्याने वाढ

एकेकाळी शांत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणी शहरात खुनाच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे.  वागदरा नवीन येथील तरुणाच्या खुनाच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच शहरालगत असलेल्या गजानन नगरी येथे अशीच घटना घडल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे यावरून दिसते आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top