-->

वासुदेव विधाते यांची राष्ट्रीय परिषदेसाठी निवड

0

 वासुदेव विधाते यांची राष्ट्रीय परिषदेसाठी निवड 


महाराष्ट्राच्या वतीने करणार प्रतिनिधित्व 


Sangini News :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ अंतर्गत पॅरा विधी स्वयंसेवक म्हणून कार्यरत असलेले वासुदेव लक्ष्मण विधाते यांची दिनांक ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी म्हणून राज्य पातळीवर निवड करण्यात आली आहे.  Vasudev Vidhate elected to the National Council     



     जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांनी विधाते यांच्या उत्कृष्ट कामामुळे त्यांचे नाव या राष्ट्रीय परिषदेसाठी नामनिर्देशित केले होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांनी या नामांकनाची दखल घेऊन, राज्याच्या वतीने परिषदेला हजर राहण्यासाठी विधाते यांची निवड केली आहे. विधी सेवा वितरण यंत्रणा बळकट करणे या विषयावर होणारी परिषद ऑडिटोरियम हॉल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग कॉम्प्लेक्स, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली इथे संपन्न होणार आहे. 
     यवतमाळ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, दीपक एच. दाभाडे यांनी याबाबत  विधाते यांना पत्राद्वारे कळवीले असून, ही यवतमाळ जिल्ह्यासाठी एक मोठी संधी असल्याचे नमूद केले आहे. विधाते यांच्या या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी अभिनंदन केले असून विधाते आता राष्ट्रीय पातळीवर विधी सेवा आणि मोफत न्याय प्रणाली बळकट करण्याच्या दिशेने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top