-->

बालू जोगी उतरणार प्रभाग एक मधून निवडणुकीच्या रिंगणात

0

 बालू जोगी उतरणार प्रभाग एक मधून निवडणुकीच्या रिंगणात

मतदारांशी संपर्क वाढला

वणी / sangini news:-  नगर पालिकेच्या आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या रिंगणात बालू उर्फ उमाकांत जोगी प्रभाग एक मधून उतरण्याची दाट शक्यता आहे.  त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी देखील सुरू केल्या आहेत.  आता कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेणार हे निश्चित झाले नसले तरी निवडणूक लढणार असल्याची चर्चा मात्र जोमात आहे. Balu Jogi will contest from Ward One.

बालू जोगी उतरणार प्रभाग एक मधून निवडणुकीच्या रिंगणात



     नुकतेच वणी नगर पालिकेचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाले आहे.  आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी निवडणूक लढविण्यासाठी कंबर कसली आहे.  काही इच्छुक उमेदवार तिकीट मिळविण्यासाठी सत्ताधारी, व  जनमानसात असलेल्या विरोधी पक्षाशी सलोखा राखून आहे.  उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी नेत्यांकडे जणू फिल्डिंग लावल्याचे बघायला मिळते आहे.  Wani Nagar palika Election
      सध्यातरी वणी नगर पालिकेत नगरसेवक पदावर जाण्याची स्वप्ने अनेकांनी रंगविली आहे.  परिणामी भेटीगाठी चर्चा त्यातच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या घराचे उंबरठे झिजवायला सुरुवात देखील केली आहे.  काहींना नेत्यांकडून हिरवी झेंडी मिळाली असल्याचे इच्छुक उमेदवार बोलून दाखवत आहे.  आता राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाची उमेदवारी मागणार की, विरोधी पक्षाची हे येत्या काळात कळणार आहे.


प्रभाग एक मधून बालू जोगीचे नाव चर्चेत!

     वणी शहरातील नांदेपेरा मार्गावरील बँक कॉलनी परिसरातील बालू उर्फ उमाकांत जोगी या मितभाषी मनमिळाऊ तरुणाला नागरिकांची पसंती असल्याने स्थानिक नागरिकांच्या आग्रहास्तव ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे.  अद्याप कोणत्या पक्षाची उमेदवारी घेणार हे जरी निश्चित नसले तरी त्यांच्या मित्रमंडळींनी बालू जोगीच्या उमेदवारी साठी नेत्यांकडे फिल्डिंग लावल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे.  कोणत्याही पक्षाची उमेदवारी मिळाली तरी जिंकण्यासाठी त्यांच्या मित्रमंडळींनी जणू कंबर कसली असल्याचे बघायला मिळते आहे. आता घोडा मैदान जवळच आहे.  कोणाचे भाग्य उजळणार ही येणारी वेळच ठरविणार आहे.
संगिनी न्यूज च्या सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top