-->

प्रभाग चार मधून धीरज भोयर सक्षम उमेदवार - ऍड उमेश ढुमणे

0

 प्रभाग चार मधून धीरज भोयर सक्षम उमेदवार! - ऍड उमेश ढुमणे

वणी:-/ आगामी होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग चार मधून सक्षम तडफदार उमेदवार म्हणून बघायचे झाल्यास युवा सक्षम उमेदवार जर कोणी असेल तर तो धीरज भोयर आहे. असे मत ऍड उमेश ढुमणे यांनी व्यक्त केले आहे. Municipal council Wani     


प्रभाग चार मधून धीरज भोयर सक्षम उमेदवार - ऍड उमेश ढुमणे


      आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ४ मधून धीरज भोयर हे नाव जोरदार चर्चेत आहे.  सुशिक्षित,समाजसेवेची ओळख, कार्यक्षम नेतृत्व आणि विकासाभिमुख दृष्टिकोन या गुणांमुळे ते एक सक्षम व योग्य उमेदवार म्हणून समोर येत आहेत. यातही समाजकारण सोबतच राजकीय अनुभव सुद्धा भरपूर आहे. 
     धीरज भोयर यांनी गेल्या काही वर्षांत विविध सामाजिक चळवळीत मोलाचा सहभाग  घेतला आहे.  तसेच प्रभागातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.  नागरिकांच्या समस्या समजून घेत, त्या सोडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेणारे म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.   प्रभाग चार मध्ये चिखलगाव परिसरातील मतदार जोडले गेले आहे.  परिणामी या भागातही त्यांची चांगलीच ओळख असल्याने नागरिकांची प्रथम पसंदीचा उमेदवार असू शकतो. 
     स्थानिक नागरिकांच्या मते, “धीरज भोयर हे तरुण, प्रामाणिक आणि काम करणारे व्यक्तिमत्व असून त्यांच्याकडून प्रभागाचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे.”   प्रभाग क्र. ४ मधील आगामी निवडणुकीत धीरज भोयर यांची उमेदवारी नागरिकांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरली आहे.    कोणत्या पक्षाकडून उमेदवारी दाखल करावी. सध्या ठरले नसले तरी स्थानिकांच्या आग्रहास्तव उमेदवारी दाखल निश्चित करणार असे त्यांचे बंधू ऍड.उमेश ढुमणे यांनी सांगितले आहे.. 


 “माझं ध्येय म्हणजे प्रत्येक नागरिकापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवणं, स्वच्छ आणि सुशोभित वणी घडवणं, आणि युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी उभारणं आहे. :धीरज भोयर

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top