-->

ऐन दिवाळीत ठाकरे शिवसेनेचे सरकारविरोधात चटणी भाकर खाऊन आंदोलन

0

 ऐन दिवाळीत ठाकरे शिवसेनेचे सरकारविरोधात चटणी भाकर खाऊन आंदोलन

शेतकरी विरोधी सरकारने केली शेतकऱ्यांची काळी दिवाळी

वणी/ संगिनी न्यूज:-  अतिवृष्टीमुळे बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिवाळीपूर्वी मदतीच्या आश्वासनांची खैरात वाटली मात्र शेतकऱ्यांना कोणतीही शासकीय मदत केली नसल्याने शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ काळी दिवाळी करीत चटणी भाकर खाऊन शेतकरी विरोधी सरकार विरोधात २१ ऑक्टोबर मंगळवारी आंदोलन केले आहे. Thackeray Shiv Sena protests against the government by eating chutney and bread on Diwali

ऐन दिवाळीत ठाकरे शिवसेनेचे सरकारविरोधात चटणी भाकर खाऊन आंदोलन


     दिवाळीच्या सणाच्या दिवशी, जेव्हा सगळीकडे आनंद आहे, तेव्हा शेतकऱ्यांच्या घरात मात्र हताशा आणि चिंता आहे. शेतकऱ्यांच्या या वेदनेला आवाज देण्यासाठी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेतर्फे चटणी-भाकर खाऊन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार संजय दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, आणि हेक्टरी ₹५०,००० मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, या ठोस मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.


शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आमचा लढा सुरूच राहील!”

     "भाजप सरकारने सुरुवातीला तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा जीआर काढून शेतकऱ्यांची दिशाभूल केली, आणि नंतर तो जीआर रद्द करून दोन हेक्टरचा सुधारित जीआर काढला. म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवूनच वार केले!
या युती सरकारने शेतकऱ्यांशी विश्वासघात केला आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनात शिवसैनिक रस्त्यावर उतरले की त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दडपशाही केली जाते. पण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत — आम्ही घाबरणार नाही. 
 :- आमदार संजय दरेकर


     

या आंदोलनात जिल्हाप्रमुख संजय निखाडे, जिल्हा संघटक गणपत लेडांगे, जिल्हा समन्वयक सुधीर थेरे, विधानसभा प्रमुख सुनील काकडे, वणी तालुकाप्रमुख संतोष कुचनकार, मारेगाव तालुकाप्रमुख पुरुषोत्तम बुट्टे, उपजिल्हाप्रमुख दीपक कोकास, जिल्हा संघटिका डिमनताई टोंगे, तसेच विनोद दुमणे, शरद ठाकरे, राजू तूरनकर, लोकेश्वर बोबडे, संजय देठे, प्रकाश खरात, रविकांत जयस्वाल, ढेंगळे गुरुजी, दिवाकर भोंगळे, सतीश वर्हाटे यांसह वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील शेकडो शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top