-->

वेकोलीच्या नेता विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकला

0

 वेकोलीच्या नेता विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकला

महिला कर्मचाऱ्याला धमकावणे पडले महागात


वणी:-  वेकोलीच्या कामगार संघटनेचा नेता असल्याचे सांगत एका महिला कर्मचाऱ्याला सतत त्रास देऊन धमकावत रस्त्यात वाहन थांबवून विनयभंग केला असल्याच्या तक्रारीवरून सदर वेकोली नेत्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. WCL leader arrested for molestation

वेकोलीच्या नेता विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकला



    वणी शहरातील  ३४ वर्षीय महिला वेकोलीच्या जी एम ऑफिसमध्ये कार्यरत आहे.  यातच कामगार संघटनेचा नेता सुनील भाऊराव मोहितकर ५५ हा नेहमीच कार्यालयात पडीक असतो.  परिणामी कार्यरत लिपिक महिलेच्या कक्षात जाऊन नेहमीच तिला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत होता.  नाहीतर तुझी बदली करेल अशी धमकी देत असल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.  

     १३ ऑक्टोबर ला सायंकाळी साडेसहा चे सुमारास तक्रारदार महिला तिच्या स्कुटरने भालर रोडने जात असतांना वेकोली कामगार नेता त्याचे हेरिअर कारने सदर महिलेचा पाठलाग करत तिच्या स्कुटर समोर आला.  तिला अडवुन त्याच्या कारच्या बाहेर येवुन पीडितेला जबरदस्तीने स्वताच्या कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न करुन तिचा विनयभंग केला.  तेव्हा फिर्यादी महिलेने विरोध केला असता नेता सुनील ने त्याच्या कार मधुन चाकु काढुन फिर्यादीच्या मानेला लावुन चुपचाप गाडीत बस नाहीतर जिवाने मारुन टाकेल अशी धमकी दिली असल्याची तक्रार देशमुख वाडी परिसरात राहणाऱ्या वेकोलीच्या कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत महिलेने वणी पोलिसांत दिली.


     त्या तक्रारीवरून पोलिसांनी सुनिल भाऊराव मोहीतकर वय 55 वर्ष, रा. जैनलेआऊट निअर हनुमान मंदीर वणी यांच्याविरोधात  कलम 74,75,78,87,296,352,351 (2), 351 (3) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करीत सुनीलला त्याच्या महागड्या कार सह अटक केली.  त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने नेत्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रियंका चौधरी करीत आहेत.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top