सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या बुटफेकी घटनेचा वणीत काँग्रेसतर्फे तीव्र निषेध
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी; संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन
वणी : भारताचे मा. सरन्यायाधीश (CJI) भूषण गवई यांच्यावर झालेल्या बुटफेकीच्या घटनेचा वणी काँग्रेस कमिटीच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणात दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी काँग्रेसतर्फे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी, वणी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले. Congress strongly condemns the shoe-throwing incident on Chief Justice Bhushan Gavai in Wani।
दुपारी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गोळा झाले. तिथे काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी सदर घटना विषद केली. तर मान्यवरांनी ही घटना लोकशाही व्यवस्थेला घातक असल्याचे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर या धटनेचा सामुहिक निषेध व्यक्त करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सर्व आंदोलकांनी तहसील कार्यालयात धडक देत याबाबत निवेदन सादर केले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “भारतीय न्यायसंस्था ही लोकशाहीचा एक अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे. तिच्या प्रमुख पदावर असलेल्या सरन्यायाधीशावर अशाप्रकारे हल्ला करणे हे केवळ व्यक्तिवर नव्हे, तर भारतीय संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच हल्ला आहे.”
काँग्रेसने या घटनेला देशातील कायदा-सुव्यवस्थेवरील गंभीर आघात म्हटले असून, संबंधित व्यक्तीवर भारतीय दंडसंहिता कलम 124(A) अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, अशा घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
सदर आंदोलन वणी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात पार पडले. यावेळी अशोक चिकटे, विजय निखाडे, गणेश लाकडे, अनंता डंभारे, पी.एस. उपरे, संदीप कांबळे, वैभव डंभारे, पुरुषोत्तम आवारी, एन.पी. ठाकरे, राजू अंकतवार, नरेंद्र काटोके, रवी कोटावार, विकेश पानघाटे, रवींद्र कांबळे, रमेश तांबे, सुरेश रायपुरे, दिनेश पाहुणकर, गजानन आलोने, चंद्रमणी दासोडे, करुणा कांबळे, लता संजय पाटील, प्रमोद वासेकर, विजयराव मुखेवार, सुधीर खंडारकर, हेमंत गोहणे, संजय शेंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.