शेतकऱ्यांने धाडसाने वाघाच्या तावडीतून केली बैलाची सुटका
उपचारादरम्यान बैलाचा मृत्यू, मुकुटंबन परिसरातील घटना
संगिनी न्यूज : रूईकोट शिवारातील एका शेतकऱ्याने जीवाची पर्वा न करता वाघाच्या तावडीत अडकलेल्या आपल्या बैलाची सुटका करत अपार धैर्य दाखवले. तब्बल दोन तासांच्या संघर्षानंतर त्याने वाघाला पळवून लावले, मात्र गंभीर जखमी झालेल्या बैलाचा शेवटी मृत्यू झाला. Farmers bravely rescue bull from tiger's clutches
ते दृश्य पाहून गोविंदाने झाडावरून खाली उतरून हातातील पाण्याच्या डपक्या, ड्रम वाजवत वाघाला घाबरवले. सुमारे दोन तास चाललेल्या या संघर्षात अखेर वाघ माघारी फिरला. मात्र वाघाच्या तीक्ष्ण नखांच्या जखमांमुळे बैल गंभीर जखमी झाला. स्थानिकांच्या मदतीने बैलाला शेतातील सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अडीच तासांनी म्हणजेच सकाळी अकराच्या सुमारास वनविभाग मुकूटबनचे क्षेत्र सहायक अधिकारी (वनपाल) संजय माघाडे, पि. आर. बुर्रेवार (वनरक्षक मुकूटबन बिट), एस. डब्ल्यू. जूनगरी (वनरक्षक हिरापुर बिट), संरक्षण मजूर सुनिल पवार, मंगल टोंगे व दिवाकर सिडाम अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोका पाहणी करून बैलाला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यास सांगितले. मात्र वाघाच्या तीक्ष्ण नखांच्या हल्ल्यामुळे बैल गंभीर जखमी झाला होता. दवाखान्यात पोहोचताच बैलाचा मृत्यू झाला.
पत्रकाराच्या हस्तक्षेपामुळे वन विभागाला आली जाग
शेतकरी गोविंदाने झाडावरूनच भीतीच्या अवस्थेत मोबाईलद्वारे माहिती घरी कळवली होती. सकाळी ८.३० वाजता त्याचे नातेवाईक व नागरिक वन अधिकाऱ्यांकडे गेले, परंतु सकाळी १० वाजेपर्यंत कोणतीही कारवाई झाली नव्हती. स्थानिक पत्रकार रफीक कनोजे यांनी हस्तक्षेप केल्यानंतरच पत्रकार, वनपाल, वनरक्षक व वनमजूर ११ वाजता पायदळी घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत वाघ जंगलात अदृश्य झाला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने नुकसानभरपाई आणि वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. Van vibhagane shetkaryala tatkal shaskiy madat milvun dyavi Forest

