शेतकरी विरोधी सरकार विरोधात ठाकरेंची शिवसेना मैदानात
काळी दिवाळी, शिदोरी आंदोलन.
वणी:- sangini news/ अतिवृष्टीमुळे डबघाईला आलेल्या शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत घोषणाबाजी करून मदत न करणाऱ्या शेतकरी विरोधी सरकार विरोधात शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मंगळवार २१ ऑक्टोबर ला दुपारी बारा वाजता काळी दिवाळी, शिदोरी आंदोलन करणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. Government of maharashtra. Thackeray's Shiv Sena in the fray against the anti-farmer government
"शेतकऱ्याच्या आयुष्यात अंधार , अंधारात जाणार शेतकऱ्यांची दिवाळी, शासन मात्र गप्प गार ! आणि निवडणुकांच्या बैठकीत व्यस्त!!"
अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा सरकारी मदतीकडे लागल्या होत्या. दिवाळी पूर्वी मदत मिळेल या आशेवर शेतकरी टक लावून होता. मात्र शासनाकडून जीआर प्राप्त न झाल्याने मदत तर दूरच अद्याप याद्या सुद्धा अपलोड झालेल्या नाही. परिणामी शेतकऱ्यांची ऐन सणासुदीत आर्थिक कोंडी झाली आहे. शासकीय मदतीकडे बळीराजाच्या नजरा लागल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिवाळी आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल असे आश्वासन दिले होते. अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पुरता हताश झाला आहे. शासनाने मदतीसह कर्जमाफी देणे गरजेचे होते. मात्र हे सरकार शेतकरी विरोधी असून, अद्याप नुकसानीची मदतही मिळालेली नाही. राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी. अतिवृष्टी, ओला दुष्काळ आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले शेतकऱ्याच्या हातात काहीच राहिले नाही, दिवाळीचा आनंदही घेता आला नाही. अशा विवंचनेत असतांना राज्याचे मुख्यमंत्री निवडणुकांमध्ये व्यस्त आहे.

"काळी दिवाळी" शिदोरी आंदोलन
शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी ₹50,000/- अनुदान द्या.या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या दिवाळीत "काळी दिवाळी" शिदोरी आंदोलन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. संजय दरेकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख संजयजी निखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, झरी मारेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी, आजी , माजी ,ज्येष्ठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी २१ ऑक्टोबर ला दुपारी १२ वाजता वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर (शिवतीर्थावर) उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे....