-->

दिवाळी सणाच्या दिवशीच शेतकऱ्याची आत्महत्या

0

 दिवाळी सणाच्या दिवशीच शेतकऱ्याची आत्महत्या

कुरई येथील धक्कादायक घटना


वणी/ Sangini News:-  शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुरई येथील ३६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने ऐन दिवाळी सणाच्या दिवशी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  Farmer commits suicide on Diwali festival day.

दिवाळी सणाच्या दिवशीच शेतकऱ्याची आत्महत्या


      तालुक्यातील  कुरई येथील शेतकरी शंकर गणपत चटप हा तरुण शेतकरी पत्नी शितल, मुलगा अभिनंदन वय ५ , तीन वर्षीय मुलगी हिमांशी यांच्यासह राहत होते.  शंकरच्या पत्नीचे नावे तीन एकर जमीन आहे.  २० ऑक्टोबर सोमवारी रात्री साडेनऊ वाजताचे सुमारास शंकर ने राहत्या घरीच विषारी द्रव्य प्राशन केले.  हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले.  मात्र शंकर ने उपचारास प्रतिसाद न दिल्याने मंगळवारी रात्री नऊ वाजताचे सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  
     ऐन दिवाळीत शंकर ने आत्महत्या करण्याचे कारण सध्यातरी अस्पष्ट आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top