चोरडिया यांचा प्रचाराचा नारळ नेमका कुठं फुटणार?
स्वगृहातच फटाका की, लवंगी?
वणीच्या राजकारणात नवीन ट्विस्ट
वणी/ Sangini News:- सध्या वणी नगर पालिका निवडणुकीचे सर्व पक्षांना वेध लागले आहेत. यातच अनेकांनी पक्ष प्रवेश करण्याचा जणू ध्यास उचलला असल्याचे दिसायला लागले आहे. यातच काँग्रेस, भाजप नंतर शिंदे गटात नुकतेच गेलेले चोरडिया यांनी खेळी करीत नवीन डाव साधत स्वगृहातूनच? प्यादे देत एक नवीनच खेळी खेळल्याचे बघायला मिळते आहे. म्हणूनच वणीतील मोठे व्यापारी चोरडिया यांचा नारळ नेमका कुठे फुटणार हे न समजणारे कोडेच आहे. Where exactly will Chordia's campaign coconut burst?

वणीतील प्रसिद्ध सोने चांदीचे व्यापारी व राजकारणात राज्य स्तरावर विविध पदावर असणारे विजय चोरडिया सध्या वणीच्या राजकारणात खळबळ माजवणारे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांत गणती होणारे नेतृव आहे.
याआधी काँग्रेस पक्षात असणारे व नंतर भाजपात राज्याच्या पदावर असणारे विजय चोरडिया यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबातील ऍड कुणाल चोरडिया हे भाजपच्या जिल्हा कमेटीत प्रमुख पदावर विराजमान आहे. इतकेच नव्हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात विजय चोरडिया यांचे प्रमुख हस्तक मानले जाणारे उमेश पोद्दार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सक्रिय असल्याचे त्यांनीच बोलून दाखविले आहे. परिणामी चोरडिया यांच्या राजकारणाचे मूळ काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.
आगामी वणी नगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपचा नवीन चेहरा म्हणून ऍड कुणाल चोरडिया यांच्या नावाचा माध्यमातून मोठया प्रमाणात प्रचार व प्रसार होतो आहे. इतकेच नव्हे त्यांनी अलगत प्रचार कार्याला सुरुवात देखील केली आहे. तर दुसरीकडे पूर्वी भाजप मध्ये राज्याच्या कार्यकारिणीत असलेले विजय चोरडिया यांनी नुकताच शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. परिणामी चोरडिया यांचा प्रचाराचा नारळ नेमका कुठं फुटणार? की, स्वगृहातच फटाका लावणार अन्यथा लवंगी फटका लावणार ही येणारी वेळच ठरविणार आहे.
वणीतील सोन्या चांदीचे मोठे व्यापारी विजय चोरडिया यांनी भाजप मधून नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. माजी आमदार यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करीत व माजी आमदार बोदकुरवार यांच्या एकसूत्री कार्यक्रमाला कंटाळून त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला असल्याचे वृत्त आधीच झळकले होते.
तर दुसरीकडे त्यांचे चिरंजीव ऍड कुणाल चोरडिया हे भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीत प्रमुख पदावर कार्यरत आहेत. आणि इतकेच नव्हे तर, कुणाल चोरडिया हे नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलल्या जात आहे. परिणामी चोरडिया कुटुंबातील राजकीय क्षेत्रात असलेले नेमके कुठे हा प्रश्न अनुत्तरित आहे. आता नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उलथापालथ होण्याची चिन्हे दिसायला लागली आहे.
याहून अधिक विजय चोरडिया यांचे खंदे समर्थक उमेश पोद्दार हे शिवसेना ठाकरे पक्षात आहेत. एकीकडे चोरडिया कुटुंबातील ऍड कुणाल चोरडिया निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसत असतांना एकाच बैठकीतीतील लोक अनेक पक्षात असल्याने हे जनतेला न समजणारे कोडेच आहे. आता चोरडिया परिवार भाजप सोबत की, शिंदे सेने सोबत हे न सुटणारे कोडेच आहे?
भाजप की, शिवसेना?
चोरडिया कुटुंबातील म्हणजेच घरातील नेते दोन पक्षात आहेत. त्यातच त्यांचा खास हस्तक शिवसेना ठाकरे पक्षात आहे. आता कोण, केव्हा, कुठे हे न उलगडणारे कोडेच असल्याचे सध्यातरी दिसते आहे.
आता वणीच्या राजकारणात यानिमित्ताने एक नवीन ट्विस्ट बघायला मिळतो आहे. आगामी काळात नगर पालिका निवडणुकीत कोणत्या घडामोडी घडणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.