शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणे ठरतोय गुन्हा
शिवसैनिकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे.
आ. संजय देरकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
वणी:- अतिवृष्टीमुळे देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सोमवारी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या वाहनाचा ताफा अडवून प्रश्न उपस्थित करणाऱ्या शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्हे मागे घेण्यासाठी आमदार संजय देरकरांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. Fighting for farmers' rights is becoming a crime।
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके मातीमोल झाली आहे. शासनाने ओला दुष्काळ अद्याप जाहीर केला नाही. शिवसेना(ठाकरे) शिवसैनिक शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आणि त्यांच्या अडचणींवर लक्ष वेधण्यासाठी शांततामय आंदोलन करत होते. वणी शहरात राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या समोर उद्दिष्ट फक्त शेतकऱ्यांच्या समस्यांचे सरकार समोर मांडणे इतकाच होता. पण आंदोलनानंतर हुकूमशाही प्रवृत्तीच्या सरकारकडून शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हे गुन्हे बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसैनिकांच्या सन्मानावर आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी केलेल्या प्रयत्नांवर हल्ला करणारे आहेत. सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि शिवसैनिकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेतले जावेत. अशा आशयाचे पत्र आमदार संजय देरकर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

.webp)